Home ब्रेकिंग न्यूज Donald Trump : वाटाघाटींच्या टेबलावर इराणचा नवा डाव; ट्रम्प यांना समजून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत

Donald Trump : वाटाघाटींच्या टेबलावर इराणचा नवा डाव; ट्रम्प यांना समजून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत

0
Donald Trump : वाटाघाटींच्या टेबलावर इराणचा नवा डाव; ट्रम्प यांना समजून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामासाठी सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनाचा अंदाज घेण्यासाठी इराणने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘ड्रॉप साइट’च्या वृत्तानुसार, चर्चेची दिशा सकारात्मक ठेवण्यासाठी आणि ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी इराणी शिष्टमंडळाने हा अनोखा मार्ग अवलंबला. एप्रिल महिन्यात इस्लामाबाद येथे झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीनंतर इराणने आपल्या सल्लागार समितीत दोन वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश केला. अमेरिकेशी संवाद साधताना कोणती भाषा वापरावी, संदेश कशा पद्धतीने मांडावेत आणि ट्रम्प यांच्या संभाव्य प्रतिक्रियांचा अंदाज कसा घ्यावा, याबाबत या तज्ज्ञांनी इराणी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. एका इराणी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून, त्यांच्याशी प्रभावी संवाद साधण्यासाठी संदेशांची रचना करण्यात आली,” असे सांगण्यात आले. इराणी अधिकाऱ्याने दावा केला की, मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संदेश पाठवण्यास सुरुवात केल्यानंतर ट्रम्प यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रिया अधिक सकारात्मक आणि रचनात्मक झाल्या. या चर्चेतील प्रत्येक संवाद भविष्यात ऐतिहासिक दस्तऐवज ठरू शकतो, याची जाणीव इराणी शिष्टमंडळाला होती. त्यामुळे भविष्यात हे संवाद सार्वजनिक झाल्यास दोन्ही देशांच्या वाटाघाटींची पातळी आणि मुत्सद्देगिरी जगासमोर दिसावी, अशा पद्धतीने चर्चा हाताळण्यात आल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

https://prahaar.in/2026/06/16/vijay-singhal-appointed-as-special-officer-on-duty-for-the-dharavi-redevelopment-project/

दरम्यान, अमेरिकेत ट्रम्प यांच्या आरोग्य आणि निर्णयक्षमतेबाबत चर्चा सुरू असतानाच हे वृत्त समोर आले. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या अलीकडील वैद्यकीय तपासणीत २२ वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले होते. ही संख्या मागील तपासण्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमेरिका आणि इराणच्या संबंधांच्या हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि शत्रुत्व संपवण्यासाठी प्राथमिक सामंजस्यावर सहमती दर्शवल्याचे सांगण्यात आले आहे. या करारावर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे १९ जून रोजी अधिकृत स्वाक्षरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here