Home महाराष्ट्र नाशिक Nashik : चिंचखेड येथे बिबट्याची दोघांवर झडप, थोडक्यात बचावले

Nashik : चिंचखेड येथे बिबट्याची दोघांवर झडप, थोडक्यात बचावले

0
Nashik : चिंचखेड येथे बिबट्याची दोघांवर झडप, थोडक्यात बचावले

दिंडोरी : तालुक्यात बिबट्यांचा सुळसुळाट कायम आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याने दोन शेतकऱ्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रमेश रंगनाथ पांडे (वय 70) आणि अक्षय अनिल पगारे (वय 26) या दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे.

नेमकं काय घडलं ?

सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान रमेश रंगनाथ पांडे शेतातून काम आटोपून मोटारसायकल वरून घरी येत होते. पांडे यांच्या हातात दुधाची किटली होती. दरम्यान बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने पांडे यांच्या गुडघ्याला चावा घेतला. ज्यामुळे पांडे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गाडीवरून गावाकडून मळ्याकडे जात असताना अक्षय पगारे या तरुणाच्या गाडीवर बिबट्याने धडक मारत त्याच्याही पायाला चावा घेतला.

दोन्ही जखमींवर स्थानिक डॉक्टरांनी ड्रेसिंग करून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर या बिबट्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here