Home ब्रेकिंग न्यूज The Global Superstar Rihanna : अंबानींची खास भेट! रिहानाने कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केले २.२ कोटींचे हिऱ्याचे ब्रेसलेट

The Global Superstar Rihanna : अंबानींची खास भेट! रिहानाने कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केले २.२ कोटींचे हिऱ्याचे ब्रेसलेट

0
The Global Superstar Rihanna : अंबानींची खास भेट! रिहानाने कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केले २.२ कोटींचे हिऱ्याचे ब्रेसलेट
Rihaana

जगप्रसिद्ध पॉप स्टार (The global superstar) रिहानाकडे (Rihanna) दागिन्यांचा एक मोठा आणि मौल्यवान खजिना आहे, यात शंकाच नाही. मात्र, नुकताच तिने एका मुलाखतीदरम्यान घातलेल्या एका खास ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द पीपल गॅलरी’शी संवाद साधत असताना रिहानाने हे चमकणारे हिऱ्याचे ब्रेसलेट अत्यंत सहजपणे कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केले, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

अंबानींच्या भेटीचे खास आकर्षण

एका अनौपचारिक फॅशन चॅटच्या दरम्यान, रिहानाने आपल्या हातातील दागिन्यांच्या साखळीत (स्टॅक) असलेल्या एका विशेष ब्रेसलेटबद्दल माहिती दिली. हे ब्रेसलेट पाहून अनेकांना कुतूहल वाटले असता, खुद्द रिहानानेच हे रहस्य उलगडले की, हे मौल्यवान हिऱ्याचे ब्रेसलेट तिला भारतातील प्रसिद्ध अंबानी कुटुंबाने भेट म्हणून दिले आहे.

https://prahaar.in/2026/06/16/cough-syrup-new-rules-2026-big-news-before-the-monsoon-a-doctors-note-will-be-required-for-cough-syrup-important-change-in-the-drug-rules/

२.२ कोटींचे मूल्य आणि जवळीक

 

View this post on Instagram

 

A post shared by ambaniinsider (@ambaniinsider)

हे ब्रेसलेट वरकरणी साधे वाटत असले तरी, त्याची किंमत ऐकून कोणालाही धक्का बसेल. दागिन्यांचे तज्ज्ञ प्रियांशू गोयल यांच्या मते, या हिऱ्याच्या ब्रेसलेटची किंमत तब्बल २.२ कोटी रुपये इतकी आहे. रिहानाच्या दागिन्यांच्या संग्रहातील हे एक अत्यंत महत्त्वाचे दागिना ठरले आहे. विशेष म्हणजे, या भेटीतून रिहाना आणि अंबानी कुटुंबातील घनिष्ठ संबंध दिसून येतात. काही काळापूर्वी रिहानाने तिच्या ‘फेंटी ब्युटी’ ब्रँडच्या लाँचिंगसाठी मुंबईला भेट दिली होती आणि यावेळी अंबानींच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी आयोजित एका खास कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती.

डेनिम लूक आणि रिहानाची स्टाईल

आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या रिहानाने यावेळी ‘डबल-डेनिम’ लूक निवडला होता. व्हिक्टोरिया बेकहॅमची निळी जीन्स आणि त्यासोबत मॅचिंग डेनिम टॉपमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत होती. तिने आपल्या हातावर विंटेज डायमंड ब्रेसलेट्स आणि रोलेक्स घड्याळासोबत अंबानींनी दिलेले हे महागडे ब्रेसलेट घातले होते. तसेच, तिच्या बोटांमधील ‘MOM’ रिंग आणि गळ्यातील मरीना बी (Marina B) डायमंड कॉलर नेकलेसने तिच्या लूकला चार चाँद लावले.

मेकअपही स्वतःच केला!

या संपूर्ण लूकची खास गोष्ट म्हणजे, रिहानाने स्वतःच तयार होणे पसंत केले. तिने अगदी नैसर्गिक आणि फ्रेश मेकअप केला होता. आश्चर्यकारक बाब म्हणजे, इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी तिने कोणत्याही प्रोफेशनल ‘ग्लॅम स्क्वॉड’ची मदत घेतली नव्हती. “हे सर्व मी स्वतःच केले आहे,” असे सांगत तिने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, डिझायनर कपड्यांपेक्षा तिची स्वतःची फॅशन समज आणि इन्स्टिंक्टच तिचे खरे सौंदर्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here