Home अध्यात्म संत नामदेव

संत नामदेव

0
संत नामदेव
sant namdev

वारंवार काय विनवावे आता।
समजावें चित्ता आपुलिया ॥
तू काय म्हणशी कंटाळेल हाची ।
जाईल उगाचि उडोनियां ॥
मजलागी देवा जासी चुकवोनी ।
आणीन धरूनी तुजलागी ॥
दृढ भक्तीभाव प्रेमाचा हा दौरा ।
बांधीन सत्वर तुझे पायीं ॥
नामा म्हणे बोल काय विठो आता ।
भेटावे सर्वथा यांत बरे ।।

संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेरही उत्तरेत पंजाबपर्यंत फडकविली. त्यांचा एकेक अभंग म्हणजे त्यांच्या अध्यात्मिक जीवनाचं दर्शन घडविणारं भावगीत आहे. त्यातून त्यांच्या अंतरंगातील भक्तीचा सुगंध दरवळत राहिला. त्यांच्या अंतरीचे आर्त आणि जिव्हाळा त्यांच्या अभंगवाणीत व्यक्त झाला. या अभंगात त्यांच्या भक्तीरंगाचे जिव्हाळ्याचे रूप प्रकट झाले. ते म्हणतात, ‘हे विठ्ठला, मी तुझी वारंवार विनवणी करावी? तू आपल्या मनाशी याचा विचार करावा. तुला वाटले असेल हा कंटाळून उठून जाईन. तू मला चुकवून कुठे कुठे जातोस. पण लक्षात ठेव, तू कुठेही गेलास तरी मी तुला पकडून आणीन.

https://prahaar.in/2026/06/16/horrific-minibus-accident-on-the-shahapur-murbad-road-driver-killed-three-passengers-critically-injured/

माझी भक्ती दृढ आहे. तिला प्रेमाच्या धाग्यांचा भक्कम पाया आहे. हा प्रेमाचा दोरा मी तुझ्या पायात बांधीन आणि प्रेमाच्या या बंधनात तुला बंदिस्त करीन. संत नामदेव म्हणतात, ‘हे देवा, तू मला भेटावे हेच तुझ्या दृष्टीने योग्य आहे. नाहीतर तुला कसे पकडून आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे.’ संत नामदेव देवाशी संवाद करीत आहे. एक प्रकारे देवाला हुलकावणी दिलीस ती पुरे झाली. आता तू मुकाट्याने मला भेटावे अशी प्रेमळ शब्दात जणू धमकीच देत आहेत. ही ताकद संत नामदेवांच्या भक्ती भावात निश्चितपणे होती. भक्तीची उत्कट परिसीमा गाठली की देवाच्या पायात प्रेमरूपी दोरा बांधून त्याला अंकित करण्याची शक्ती भक्तामध्ये येते. નોમદેવાયાनामदेवांच्या भक्तीभावांत एक प्रकारचा लडिवाळपणा आहे. त्याच्या रोखठोक शब्दांमध्ये एक निरागस भाव आहे. नामदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला हा नितळ, पारदर्शी निरागसपणा शोभून दिसतो. भक्त आणि देवातले अंतर मिटले की देव हा सखा, मित्र होतो. याच मित्रत्वाच्या नात्याने संत नामदेवांनी देवाशी रोखठोक भाषेत आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here