मुंबई : उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी महत्त्वाचा ठरलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल 2026’ (NAFA) ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. NAFAचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या महोत्सवाचे निमंत्रण दिले.
NAFA फिल्म फेस्टिव्हल हा केवळ चित्रपट महोत्सव नसून मराठी संस्कृती, कला आणि जागतिक मराठी समुदायाला जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक मंच म्हणून ओळखला जातो. दरवर्षी भारतातील अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या महोत्सवात सहभागी होत असतात. गतवर्षी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती.
https://prahaar.in/2026/06/16/major-government-decisions-ahead-of-the-neet-ug-2026-exam-temporary-ban-on-telegram-to-prevent-paper-leaks/
यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, दिग्दर्शक महेश मांजरेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेत्री श्रुती मराठे, गिरिजा ओक यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी NAFA Stream OTT या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी असे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मात्यांना जागतिक स्तरावर आपली कलाकृती पोहोचवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्ग अधिक विस्तारण्यास मदत होईल.
https://prahaar.in/2026/06/16/shocking-air-force-officers-wife-alleges-rape-blackmail-and-forced-religious-conversion/
उत्तर अमेरिकेतील मराठी समाजामध्ये यंदाच्या NAFA फिल्म फेस्टिव्हलबाबत मोठा उत्साह असून, हा महोत्सव मराठी संस्कृती, कला आणि जागतिक मराठी ऐक्याचा भव्य सोहळा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Devendra Fadnavis)