Home महाराष्ट्र ठाणे Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

0
Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातून चिमुकल्या मुलाचे आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, वरून निकाते (वय 4 वर्षे) या चिमुकल्याने ठाण्यातील खाडीत बुडत असलेला व्यक्ती पाहिला. याच दरम्यान तो तत्परतेने धावत वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात आला आणि एका व्यक्ती पाण्यात बुडत असल्याची माहिती दिली. चिमुकल्याने दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीनंतर वाहतूक पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता तात्काळ मदतकार्य सुरू केले.

https://prahaar.in/2026/06/16/will-vaishali-nagwade-hit-the-jackpot-with-the-post-of-ncps-state-womens-wing-president/

दरम्यान, रस्त्यावरून जात असलेली अग्निशमन दलाची गाडी थांबवून पोलिसांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

या बचावकार्यात HC/2977 सोनवणे, HC/564 पाटील आणि HC/7044 पालवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत तत्परता दाखवली.

https://prahaar.in/2026/06/16/nashik-crime-body-found-in-a-decomposed-state-inside-a-suitcase/

विशेष म्हणजे, अवघ्या 4 वर्षीय वरून निकाते याच्या जागरूकतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे ही मदत वेळेत पोहोचू शकली. त्याच्या धाडसाचे आणि सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

चिमुकल्याची सतर्कता आणि पोलिस-अग्निशमन दलाच्या वेगवान प्रतिसादामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून ही घटना नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here