Home ब्रेकिंग न्यूज Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

0
Bhiwandi News: भिवंडीत हृदयद्रावक घटना! सेप्टिक टँकचे झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील फरीद बाग परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने त्यात पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. मोहम्मद अहमद मसूद असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली होती. दुपारी वडील मसूद हे आपल्या मोठ्या मुलाला शाळेतून घरी घेऊन आले. त्यानंतर लहानगा मोहम्मद अहमद हा राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळण्यासाठी गेला.

https://prahaar.in/2026/06/16/famous-music-composer-pritam-chakrabortys-post-creates-a-stir-among-fans-speculation-about-retirement-gains-momentum/

खेळताना तो पार्किंग परिसरातील सेप्टिक टँकवर ठेवलेल्या पत्र्याच्या झाकणावर चढला. मात्र, झाकण जीर्ण आणि कमकुवत अवस्थेत असल्याने ते अचानक तुटले आणि मोहम्मद अहमद थेट टँकमध्ये कोसळला.

घटनेनंतर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा करत घरच्यांना आणि स्थानिकांना माहिती दिली. नागरिकांनी तातडीने धाव घेत चिमुकल्याला बाहेर काढले आणि जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, इमारतीच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळेच हा निष्पाप जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सुरक्षेच्या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

https://prahaar.in/2026/06/16/cng-price-hike-pune-residents-hit-by-rising-costs-against-cng-price-up-by-%e2%82%b91-new-rates-effective-from-midnight/

एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एका कुटुंबाचा आनंद हिरावला गेला असून या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here