Home ब्रेकिंग न्यूज Sanchita Ugale Suicide Case : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन ?

Sanchita Ugale Suicide Case : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन ?

0
Sanchita Ugale Suicide Case : संचिता उगलेच्या आत्महत्येचे सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन ?
Sanchita Ugale

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येबाबात तिच्या वडिलांनी संशय व्यक्त केला नसला तरी तिच्या चुलत भावाने एका इन्स्टाग्राम आयडीचा दाखला देत आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे. याप्रकऱणाची सखोल चौकशी करण्याची माणी त्याने केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि संचिता या दोघांची आत्महत्या करण्याची तारीख १४ जून असून त्याचे कनेक्शन असल्याचा दावा संचिताच्या भावाने केला आहे.

https://prahaar.in/2026/06/15/shocking-kumkum-bhagya-fame-actress-sanchita-ugle-commits-suicide/

टिव्ही मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री संचिता उगलेने रविवारी संध्याकाळी नालासोपारा येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. सोमवारी संचिताचा चुलत भाऊ आकाश उगले याने मात्र खळबळजनक आरोप केला आहे. संचिताच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असताना मला इन्स्टाग्रामवर एक संशयास्पद आयडी आढळून आला होता.” edit_.by_.riyu” नावाच्या या आयडीवर संचिताचाच प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे , असे त्याने सांगितले. संचिताने आत्महत्या केली त्याच दिवशी (१४ जून) या आयडीवरून एक रील पोस्ट करण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.

https://prahaar.in/2026/06/15/another-fake-godman-ashok-kharat-has-come-to-light-in-shirdi/

या आयडीवर आलेल्या रीलमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या क्लिप्स वापरण्यात आल्या असून त्यावर ‘इट्स अगेन १४ जून’ असे लिहिण्यात आले असून ‘वी मिस यु सुशांत सर’ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. ​या आयडीवरील सर्वात शेवटची पोस्ट २ जून २०२६ ची असल्याने, हा आयडी अगदी अलीकडेच तयार करण्यात आल्याचा आरोप आकाश याने व्यक्त केला. आत्महत्येपूर्वी माझी बहीण खूप घाबरली होती असेही त्याने सांगितले. तसेच सहा वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सिने विश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर १४ जून २०२६ रोजी अभिनेत्री संचिताने आत्महत्या केली आहे. यामागे योगायोग नसून निश्चित काहीतरी घडले आहे असा दावा आकाश उगले याने केला आहे.

पंतप्रधानांकडे चौकशीची मागणी

या इंडस्ट्रीमध्ये प्रचंड दबाव आणला जातो, धमक्या दिल्या जातात. जसं सुशांत सिंह राजपूतला आतून पोखरून काढलं, तसंच काहीसं माझ्या बहिणीसोबत घडलं आहे. आपल्या देशात पावर गेम चालतो, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे जाणाऱ्या मुला-मुलींना दाबून टाकलं जातं. या इंडस्ट्रीमुळेच आज माझी बहीण आमच्यात नाही. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करण्याची त्याने मागणी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here