Home क्राईम Pune Crime: गुटख्याच्या पुडीवरून मामाचा संताप; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

Pune Crime: गुटख्याच्या पुडीवरून मामाचा संताप; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

0
Pune Crime: गुटख्याच्या पुडीवरून मामाचा संताप; बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार
Sambhajinagar Crime

पुणे: पिंपरी-चिंचवडमधील चिखली (Chikhali) परिसरात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. गुटखा आणला नाही म्हणून भाच्याला मारहाण करणाऱ्या मामाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सख्ख्या बहिणीवरच त्याने कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. (Attack News)

https://prahaar.in/2026/06/15/pune-water-cut-a-major-blow-for-punekars-alternate-day-water-supply-starts-today-municipal-corporation-takes-a-tough-decision-due-to-depleting-dam-reserves/

 मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१३ जून) मध्यरात्री चिखली येथील मोरे वस्ती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी प्रियांका सचिन कदम (वय ३५) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संतोष पांडुरंग कांबळे (वय ४२) याच्याविरोधात गुcन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष कांबळे याने त्याचा भाचा रोहन याला गुटखा आणण्यासाठी दुकानात पाठवले होते. मात्र रोहन गुटखा न आणताच परत आल्याने संतापलेल्या संतोषने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून प्रियांका कदम यांनी भावाला रोखण्याचा प्रयत्न केला. याचाच राग येऊन संतोषने घरातील धारदार कुऱ्हाड उचलली आणि बहिणीच्या डोक्यात वार केला.

https://prahaar.in/2026/06/15/he-did-the-unthinkable-to-me-a-new-twist-in-the-saksham-tate-case/

या हल्ल्यात प्रियांका कदम गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

एका गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here