– नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ठाणे : अंबरनाथ तालुक्यात उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे. (Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil)
पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता GJ-12 BY-7560 क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. या टँकरमध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल असल्याचे निदर्शनास आले. तसेच MH-43 E-190 क्रमांकाचा आणखी एक टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू असल्याचे आढळले. (Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil)
https://prahaar.in/2026/06/15/maharashtra-monsoon-weather-alert-maharashtras-wait-for-rain-continues-monsoon-delayed-again-el-nino-threat-persists/
याशिवाय MH-46 C-1282 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. या वाहनात २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील आढळून आले. घटनास्थळी जमिनीवर आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम (AOD) पंप जप्त करण्यात आला. या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil)
ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाचे सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. (Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil)
https://prahaar.in/2026/06/15/iran-us-war-peace-agreement-finally-an-end-to-the-us-iran-conflict-a-107-day-standoff-comes-to-a-close-the-strait-of-hormuz-to-reopen/
दरम्यान, इंधनाच्या अवैध साठवणुकीमुळे महसूल नुकसान होण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Raid on Illegal Mixed Hydrocarbon Oil)