नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ३२ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला आहे. या संघात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा तात्पुरता समावेश करण्यात आला आहे.पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या नीरजने अद्याप २०२६ हंगामात स्पर्धात्मक पुनरागमन केलेले नाही. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त होत असून लवकरच स्पर्धेत उतरणार असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. अंतिम संघात स्थान निश्चित करण्यासाठी नीरजला ८२.६१ मीटरची पात्रता मर्यादा गाठावी लागणार आहे.
https://prahaar.in/2026/06/14/14-women-officers-ready-in-the-first-nda-batch-following-the-supreme-courts-verdict/
नीरजप्रमाणेच ट्रिपल जंपपटू सेल्वा प्रभू यालाही सशर्त संधी देण्यात आली आहे. त्याने नुकतेच अमेरिकेतील एनसीएए स्पर्धेत १६.९२ मीटर उडी मारून विजेतेपद मिळवले होते. मात्र, ग्लासगोसाठी पात्र ठरण्यासाठी त्याला आगामी इंटर-स्टेट स्पर्धेत पात्रता सिद्ध करावी लागेल.
भारतीय संघात २२ पुरुष आणि १० महिला खेळाडूंचा समावेश आहे. फेडरेशन कप आणि इंडियन अॅथलेटिक्स सिरीजमधील कामगिरीच्या आधारे बहुतांश खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. काही खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी विशेष सवलत देण्यात आली होती.संघात गुरिंदरवीर सिंह, अनिमेष कुजूर, गुलवीर सिंह, मुरली श्रीशंकर, तजिंदरपाल सिंह तूर, प्रियंका गोस्वामी, पारुल चौधरी, मनप्रीत कौर यांसारख्या अनुभवी खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/14/monsoon-update-will-the-monsoon-arrive-in-mumbai-by-june-20/
भारतीय संघातील प्रमुख खेळाडू
नीरज चोप्रा – भालाफेक
रोहित यादव – भालाफेक
यशवीर सिंह – भालाफेक
मुरली श्रीशंकर – लांब उडी
तजिंदरपाल सिंह तूर – गोळाफेक
गुरिंदरवीर सिंह – १०० मीटर
अनिमेष कुजूर – २०० मीटर
पारुल चौधरी – ५००० मीटर
प्रियंका गोस्वामी – रेस वॉक
मनप्रीत कौर – गोळाफेक