Home क्राईम इन्स्टाग्राम पोस्ट करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी वाचवले

इन्स्टाग्राम पोस्ट करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी वाचवले

0
इन्स्टाग्राम पोस्ट करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी वाचवले

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूरचा रहिवासी असलेला एक तरुण मानसिक तणावाखाली होता. याच स्थितीत त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. एक इन्स्टा पोस्ट करून करत असलेल्या कृत्याची माहिती सार्वजनिक केली. मेटाच्या यंत्रणेने ही पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचवली. कानपूर पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने मुलाची पोस्ट बघितली आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलीस पथक मुलाच्या घरी पोहोचले. अवघ्या सात मिनिटांत घरी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला गळफास घेण्यापासून रोखले.

https://prahaar.in/2026/06/14/fire-at-a-building-in-delhis-tughlakabad-was-not-accidental-but-deliberately-set-three-people-were-burned-alive/

सेन वेस्ट पारा या परिसरात राहणारा एक ३० वर्षीय तरुण प्रेयसीने बोलणे थांबवल्यामुळे मागील काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता. त्याने इतरांशी संवाद साधणे थांबवले होते. तरुण पुरता खचला होता आणि निराश झाला होता. त्या तरुणाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये त्याने आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच, इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या सुरक्षा प्रणालीने याला एक गंभीर बाब मानून तात्काळ ही माहिती थेट पोलीस मुख्यालयात पोहोचली.

https://prahaar.in/2026/06/14/e100-fuel-nitin-gadkari-signed-the-file-at-8-pm-last-night-green-light-for-e100-fuel-a-major-announcement-by-nitin-gadkari/

पोलिसांची घटनास्थळी धाव

पोलीस मुख्यालयाकडून कानपूर आयुक्तालयाच्या मीडिया सेलकडे व्हिडिओ पाठवण्यात आली. त्या तरुणाचे ठिकाण, मोबाईल नंबर आणि पत्ता यासह महत्त्वाची माहिती तात्काळ सेन वेस्ट पारा पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, इन्स्पेक्टर कादीर खान आणि हरवीर सिंग, त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अवघ्या सात मिनिटांत घरी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखले.

जेव्हा अधिकारी पोहोचले, तेव्हा तो तरुण गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस टीमने तात्काळ कारवाई केली आणि त्या तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला. नंतर, त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि त्या तरुणाला आवश्यक ती मदत पुरवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here