Home ताज्या घडामोडी Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

0
Gadchoroli News: जिल्हाप्रमुख पद गेल्याचा संताप; गडचिरोलीतील शिवसेना (उबाठा) कार्यालयात तोडफोड, एसी-पंख्यांसह साहित्य नेल्याचा आरोप

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये (Gadchoroli) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हाप्रमुख पद गेल्याच्या रागातून पक्ष कार्यालयात तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने नुकत्याच केलेल्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी पवन गेडाम, तर अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या निर्णयानंतर माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.

https://prahaar.in/2026/06/13/25-percent-water-cut-in-pune-from-monday/

आरोपांनुसार, संतप्त झालेल्या शेडमाके यांनी पक्ष कार्यालयातील पीओपीची तोडफोड केली. तसेच कार्यालयातील टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि अगदी बल्बदेखील काढून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पक्ष कार्यालयाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नव्या नियुक्त्यांनंतर पक्ष संघटनेत बदल करण्यात आले असताना कार्यालयातील तोडफोडीच्या घटनेमुळे शिवसेना (उबाठा) गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/14/sexual-assault-on-minor-girl-girl-pregnant-three-arrested/

या प्रकरणावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार, संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का आणि या वादाचा पक्ष संघटनेवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here