धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर या दोघांकडे शिखर धवनचा सर्वात जलद तीन हजार वनडे धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना धरमशाला येथील एचपीसीए स्टेडिमवर खेळला जाणार आहे. भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने तीन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने केवळ 72 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. आता शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही हा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. गिलला तीन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 47 , तर अय्यरला फक्त 23 धावांची गरज आहे. विशेष म्हणजे दोघेही अफगाणिस्तान विरूद्धच्या वन डे मालिकेत खेळत आहेत.
भारतीय फलंदाज – सर्वात जलद तीन हजार वनडे धावा
1. शिखर धवन – 72 डाव
2. शुभमन गिल – 2953 धावा (61 डाव)
3. श्रेयस अय्यर – 2977 धावा (70 डाव)
https://prahaar.in/2026/06/13/ind-vs-afg-overs-cut-off-announced-for-the-first-odi-between-india-and-afghanistan/
गिल आणि अय्यर- दमदार फॉर्ममध्ये
शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावत आपल्या फॉर्मची झलक दाखवली होती. या दोघांकडून या मालिकेतही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2027 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करत असल्याने त्याची कामगिरी अधिक लक्ष्य लागले आहे.
https://prahaar.in/2026/06/13/major-twist-in-the-malegaon-illegal-delivery-case/
आयपीएलनंतर अय्यरचे संघात पुनरागमन
श्रेयस अय्यर आयपीएल 2026 नंतर प्रथमच भारतीय जर्सीत मैदानात उतरणार आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून त्याने यंदाच्या हंगामात जवळपास 500 धावा करत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मधल्या फळीत भारताचा सर्वात विश्वासू फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अय्यरकडून या मालिकेत मोठ्या धावांची अपेक्षा आहे.
https://prahaar.in/2026/06/13/india-vs-ireland-t20-series-violence-in-belfast-causes-a-stir-will-the-india-ireland-t20-series-be-cancelled/
विराट आणि हार्दिक मालिकेतून बाहेर
विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी यशस्वी जयस्वाल याची निवड करण्यात आली आहे. तसेच हार्दिक पांड्या देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बराच काळानंतर त्याची वनडे संघात निवड झाली होती, मात्र दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन पुन्हा लांबले आहे.