Home देश Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

0
Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य प्रदेशातील इंदौर (Indoor) येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली असून, भरधाव बसच्या धडकेत प्रभात सिंह गंभीर जखमी झाले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

https://prahaar.in/2026/06/13/acb-cracks-down-on-bribe-takers-in-nandgaon/

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभात सिंह हे कामानिमित्त इंदौरमध्ये आले होते. काम आटोपून ते आपल्या कारकडे परत जात असताना शिप्रा पोलीस ठाण्याजवळ भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते घटनास्थळीच बेशुद्ध झाले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे सिंह कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रभात सिंह हे उत्तर प्रदेशातील Ballia येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनानंतर विशेष परवानगी घेऊन पहाटे ३ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी त्यांचे पार्थिव विमानाद्वारे बलिया येथे नेण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने तेथे दाखल झाले आहेत.

https://prahaar.in/2026/06/13/big-accident-in-assam-indian-air-force-an-32-transport-plane-crashes-catches-fire-at-jorhat-airbase/

दरम्यान, अपघात घडवून बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी चालकाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात असून प्रभात सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here