आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane Crashes) झाला. लँडिंगदरम्यान विमान एअर फोर्स स्टेशन परिसरात कोसळले आणि त्यानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने आपत्कालीन पथके दाखल झाली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
लँडिंगदरम्यान अपघात; कारण अद्याप अस्पष्ट :
प्राथमिक माहितीनुसार, AN-32 विमान लँडिंगच्या वेळी नियंत्रणाबाहेर गेले आणि एअर फोर्स स्टेशनच्या परिसरातच कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट आणि आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेत किती जण जखमी किंवा मृत्युमुखी पडले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)
https://prahaar.in/2026/06/13/nashik-bsnl-cable-theft-case-solved/
IAF कडून अधिकृत प्रतिक्रिया :
भारतीय वायुदलाने या घटनेला दुजोरा दिला असून, सध्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल, असे वायुदलाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली असून तांत्रिक तसेच ऑपरेशनल पैलूंवर तपास केला जाणार आहे. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)
रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर :
AN-32 विमान : वायुदलाचे ‘वर्कहॉर्स’ :
AN-32 हे सोव्हिएत युनियनमध्ये विकसित केलेले ट्विन-इंजिन टर्बोप्रॉप लष्करी ट्रान्सपोर्ट विमान आहे. भारतीय वायुदलाच्या गरजेनुसार खास तयार करण्यात आलेल्या या विमानाला “वर्कहॉर्स” म्हणून ओळखले जाते. IAF कडे सुमारे १०० AN-32 विमाने आहेत. हे विमान कठीण हवामानात आणि उंच पर्वतीय भागातही उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यात सुमारे ७.५ टन माल, ५० प्रवासी किंवा ४२ पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे. दुर्गम भागांमध्ये पुरवठा पोहोचवण्यासाठी या विमानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)
https://prahaar.in/2026/06/13/good-news-for-devotees-bhimashankar-temple-to-reopen-from-june-15-after-five-months-special-arrangements-made-for-crowd-control/
असममधील दुसरी मोठी घटना :
या दुर्घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या सुखोई Su-30MKI लढाऊ विमान अपघाताची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या अपघातात भारतीय वायुदलाचे दोन वैमानिक शहीद झाले होते. ५ मार्च रोजी जॉरहाट एअरबेसवरून नियमित उड्डाणासाठी गेलेले हे विमान करबी आंगलाँग जिल्ह्यात कोसळले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला होता आणि त्यानंतर ते दुर्गम डोंगराळ भागात कोसळल्याचे समोर आले होते. (Indian Air Force AN-32 Plane Crashes)
तपास सुरू, पुढील अपडेट्सची प्रतीक्षा :
View this post on Instagram