मुंबई : जागतिक बुद्धिबळविश्वासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ग्लोबल चेस लीग (GCL) 2026 चा चौथा हंगाम भारतातच आयोजित केला जाणार आहे. २०२६ च्या लीगचा यजमानपद बेंगळुरु शहराकडे सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा आयोजकांनी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्य वर्षी या हंगामाचा तीसरा सीजन मुंबईमध्ये यशस्वीपणे पार पडला होता . त्याआधी 2023 मध्ये दुबई आणि 2024 मध्ये लंडन येथे या प्रतिष्ठित लीगचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या वर्षी भारतात स्पर्धा होत असल्याने भारतीय बुद्धिबळप्रेमींमध्ये उत्साहचे वातावरण आहे. (Vaibhav sooryvanshi)
https://prahaar.in/2026/06/12/fifa-world-cup-2026-unfortunate-incident-during-the-opening-match-fan-dies-outside-the-stadium-what-exactly-happened/
जगातील दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने
टेक महिंद्रा आणि FIDE (आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या लीगमध्ये जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू संघात्मक स्वरूपात खेळताना दिसतील. फ्रँचायझी आधारित स्पर्धा, महिला-पुरुष मिश्र संघ आणि जलदगती सामने ही या लीगची खास वैशिष्ट्य मानला जात आहे. ग्लोबल चेस लीगचे आयुक्त गौरव रक्षित यांनी सांगितले की, बेंगळुरूमध्ये लीगचे आयोजन होणे हा बुद्धिबळाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. भारत सध्या जागतिक बुद्धिबळ चळवळीच्या केंद्रस्थानी असून, या प्रवासातील नवे पर्व बेंगळुरूमधून सुरू होणार आहे. मागील हंगामांमध्ये भारताचे युवा ग्रँडमास्टर्स डी. गुकेश, आर. प्रज्ञानानंदा तसेच दिग्गज विश्वनाथन आनंद यांनी सहभाग नोंदवला होता. यंदाही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. मात्र, चौथ्या हंगामातील संघ आणि अंतिम स्थळाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
https://prahaar.in/2026/06/12/vaibhav-suryavanshi-is-vaibhav-suryavanshis-debut-in-jeopardy-team-indias-tour-at-risk-due-to-violence-in-ireland-what-exactly-happened/
चाहत्यांसाठी सूर्वण संधी
मुंबईत झालेल्या तिसऱ्या हंगामात प्रेक्षकांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. संघांच्या रणनीती बैठका माइक्ड-अप टीम बूथ मधून थेट स्ट्रीमिंगवर ऐकण्याची संधी चाहत्यांना देण्यात आली होती. त्यामुळे वैयक्तिक खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळातील संघभावना आणि रणनीती जवळून पाहता आली होती. भारतात बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता आणि भारतीय खेळाडूंचे जागतिक वर्चस्व पाहता, बेंगळुरूमधील ग्लोबल चेस लीगचा चौथा हंगाम रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.