Home ब्रेकिंग न्यूज Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश

Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश

0
Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश
Mumbai unauthorized schools

MUMBAI : दक्षिण मुंबईतील नामांकित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या (बेकायदेशीर) चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षण विभागाने या गंभीर बाबीची दखल घेत संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, हे अनधिकृत वर्ग आणि शाळा तत्काळ बंद करण्याचे निर्देश दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू असतानाच शिक्षण विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे पालकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://prahaar.in/2026/06/12/no-protests-that-hold-passengers-to-ransom-government-committed-to-remaining-demands/

शिक्षण विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या भागातील सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाची कोणतीही मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाही वर्गाला मंजुरी नसताना या शाळा बेधडकपणे सुरू होत्या. यामध्ये क्रॉर्फड मार्केट, मशीद बंदर येथील मदनी हायस्कूल, ताडदेव तुळशीवाडी येथील युसुफ मेहर अली हायस्कूल, धारावी ९० फीट रोडवरील मदर तेरेसा हायस्कूल, धारावीतीलच संत कक्कैया मार्गावरील गणेश विद्यामंदिर, वडाळा पूर्व येथील ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल आणि गोपालराव देशमुख मार्गावरील फिनलँड इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांना एकाही वर्गासाठी मान्यता नसल्याने त्या पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत.

https://prahaar.in/2026/06/12/pune-online-gaming-scam-call-centres-12-booked-illegal-pistol-seized/

तसेच काही मान्यताप्राप्त शाळांमध्येही वर्ग बेकायदेशीरपणे भरवले जात असल्याचे शिक्षण निरीक्षकांच्या तपासणीत उघड झाले आहे. यामध्ये मशीद मार्गावरील मोहम्मदीया हायस्कूलमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि नववी ते दहावीच्या वर्गांनाच अधिकृत मान्यता असताना, तिथे इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे वर्ग अनधिकृतरीत्या चालवले जात होते. तसेच परळ-ताडदेव भागातील गोल्डन स्पायरल हायस्कूलमध्ये केवळ इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांना मान्यता असताना, तिथे इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यात आले होते.

https://prahaar.in/2026/06/12/openai-o1-mini-available-to-all-for-free-how-can-you-use-it/

दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही, याची खात्री शिक्षण विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here