मुंबई : भारत अ संघाचा कर्णधार ऋतुरााज गायकवाड सध्या श्रीलंकेत चालू ट्राई सिरीज मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 66 धावांची दमदार खेळी करत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीसह ऋतुराजने भारतीय दिग्गज विराट कोहलीचा जागतिक विक्रम मोडत लिस्ट ए क्रिकेटमधील एका खास यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सध्या ऋतुराजच्या विक्रमाची क्रिकेट विश्वात सुरु आहे.
https://prahaar.in/2026/06/11/icc-odi-world-cup-2027-odi-world-cup-schedule-announced-the-thrilling-final-to-take-place-on-this-day/
कोहलीचा विक्रम मोडण्यात यश
लिस्ट ए क्रिकेटमध्ये किमान 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम आता ऋतुराज गायकवाडच्या नावावर झाला आहे. ऋतुराजने 59.39 च्या सरासरीने 5227 धावा केल्या आहेत. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे.विराट कोहलीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 57.91 सरासरीने 16,447 धावा केल्या आहेत.मात्र आता ऋतुराजने त्यालाही मागे टाकले आहे.
https://prahaar.in/2026/06/11/indavsafga-349-runs-still-lost-by-dls/
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी (किमान 5000 धावा)
1. ऋतुराज गायकवाड – 59.39 (5227 धावा)
2. विराट कोहली – 57.91 (16447 धावा)
3. मायकल बेवन – 57.86 (15103 धावा)
4. चेतेश्वर पुजारा – 57.01 (5759 धावा)
5. खुर्रम मंजूर – 53.52 (7922 धावा)
6. एबी डिव्हिलियर्स – 53.47 (11123 धावा)
7. बाबर आझम – 53.39 (9772 धावा)
8. जेम्स टेलर – 53.39 (5365 धावा)
9. शान मसूद – 53.00 (6413 धावा)
10. सलीम इलाही – 52.30 (6277 धावा)
Continuing his fine form 👏
Vice-captain Ruturaj Gaikwad backs up his century in the previous game with a fifty 🔝
Updates ▶️ https://t.co/dMNsGrzIOD#INDAvAFGA | #TriNationSeries
(Image Credit: Sri Lanka Cricket) pic.twitter.com/R8JtYoPS0K
— BCCI (@BCCI) June 11, 2026
भारतीय फलंदाजांची दमदार खेळी, पण पावसाने फिरवले गणित !
भारत अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यातील रोमांचक सामन्यात भारतीय फलंदाजांनी ३४९ धावांचा डोंगर उभारला होता. वैभव सूर्यवंशी (४४), प्रभसिमरन सिंग (८४), तिलक वर्मा (६६) आणि ऋतुराज गायकवाड (६६) यांच्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.मात्र, अफगाणिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसाने संपूर्ण खेळाचे चित्र बदलले. अखेर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार अफगाणिस्तानला ४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय खेळाडूंच्या मेहनतीवर पावसाने पाणी फिरवल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.