मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिका 13 जूनपासून सुरु होणार आहे. या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लागले आहे.भारतीय संघातील वारिष्ट खेळाडू रोहित शर्मा सध्या एका ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. रोहितला नुकतेच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले. तो या मालिकेतील तीनही सामने खेळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अशा परिस्थितीत पहिल्याच वनडेत मैदानात उतरताच रोहितच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
मोहिंदर अमरनाथचा 37 वर्षे जुना विक्रम धोक्यात
भारतीय संघासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू सध्या माजी अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ आहेत, ज्यांनी १९८९ मध्ये वयाच्या ३९ वर्षे आणि ४४ दिवसांनी आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. रोहित शर्मा सध्या ३९ वर्षे आणि ४२ दिवसांचा आहे. त्यामुळे, जर तो धरमशाला येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरला, तर तो भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम प्रस्थापित करेल.
https://prahaar.in/2026/06/11/indavsafga-349-runs-still-lost-by-dls/
अफगाणिस्तानविरुद्ध रोहितचे दमदार आकडे
अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी नेहमीच प्रभावी राहिली आहे. त्याने आतापर्यंत या संघाविरुद्ध केवळ तीन वनडे सामने खेळले असले तरी त्यामध्ये 75 च्या सरासरीने 150 धावा केल्या आहेत.त्याच्या नावावर अफगाणिस्तानविरुद्ध एक शतकही असून त्याचा स्ट्राईक रेट 127.11 इतका प्रभावी राहिला आहे. त्यामुळे आगामी मालिकेतही रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/11/womens-worldcup-2026-starts-tommorow/
2027 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात
अफगाणिस्तानविरुद्धची ही मालिका भारतीय संघासाठी केवळ आणखी एक द्विपक्षीय मालिका नसून 2027 वनडे विश्वचषकाच्या तयारीचा पहिला टप्पा मानली जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असतील.