Home क्रीडा IND(A)vsAFG(A) : ३४९ धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडिया ‘अ’ ला पराभवाचा धक्का; पावसाच्या व्यत्ययाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा विजय

IND(A)vsAFG(A) : ३४९ धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडिया ‘अ’ ला पराभवाचा धक्का; पावसाच्या व्यत्ययाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा विजय

0
IND(A)vsAFG(A) : ३४९ धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडिया ‘अ’ ला पराभवाचा धक्का; पावसाच्या व्यत्ययाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा विजय
ind a vs afg a

Sri Lanka : भारत ‘अ’ आणि अफगाणिस्तान ‘अ’ यांच्यात पार पडलेल्या तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तब्बल ३४९ धावांचे अवाढव्य लक्ष्य उभारूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे सामन्यात वारंवार व्यत्यय आल्याने शेवटी डकवर्थ-लुईस (DLS) नियमाचा फटका भारतीय संघाला बसला आणि अफगाणिस्तान ‘अ’ संघाने बाजी मारली.

https://prahaar.in/2026/06/11/womens-worldcup-2026-starts-tommorow/

भारताची फलंदाजी: धावांचा महापूर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. प्रभसिमरन सिंग आणि युवा वैभव सूर्यवंशी यांनी अवघ्या ७.१ षटकांत ७४ धावांची भागिदारी करून दिमाखदार सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने अवघ्या २२ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ४४ धावांची वादळी खेळी केली.

यानंतर प्रभसिमरन सिंगने ८४ (६९ चेंडू, १४ चौकार) तर कर्णधार तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी ६६ धावांचे योगदान दिले. डावाच्या अखेरीस सूयांश शेडगेने २७ चेंडूंत ४० धावा फटकावल्या, ज्यामुळे भारताला ९ बाद ३४८ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून अब्दोल्लाह अहमदजाईने ५ बळी टिपत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले.

https://prahaar.in/2026/06/11/india-u19-rahul-dravid-son-got-selected/

अफगाणिस्तानचे प्रत्युत्तर आणि पावसाचा खेळ

३४९ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात आक्रमक झाली. कर्णधार इम्रान आणि हसन ऐसाखिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावा जोडल्या. भारताच्या अर्शद खान आणि अनुकूल रॉय यांनी काही विकेट्स मिळवून सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्या विकेटसाठी इम्रान आणि बहिर शाह यांनी १०८ धावांची अभेद्य भागीदारी रचली.

अफगाणिस्तानने २५.५ षटकांत २ बाद १७७ धावा केल्या असताना जोरदार पावसाने हजेरी लावली. यावेळी बहिर शाह ५१ आणि इम्रान ७५ धावांवर खेळत होते.

https://prahaar.in/2026/06/11/ben-stokes-englands-major-decision-following-the-nightclub-incident-ben-stokes-stripped-of-captaincy-and-ruled-out-of-the-second-test-as-well/

डकवर्थ-लुईस नियमाने घातला घाला

पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पंचांनी डकवर्थ-लुईस (DLS) नियमाचा आधार घेतला. त्यावेळी अफगाणिस्तानचा संघ आवश्यक धावसंख्येपेक्षा ३ धावांनी पुढे होता. नियमांच्या आधारे अफगाणिस्तानला ४ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारतीय फलंदाजांनी केलेल्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरल्याने चाहत्यांमध्ये नाराजी दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here