Home महाराष्ट्र ठाणे Thane Assault Case : ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर गुन्हा; 14 तासांनंतर पोलिसांची कारवाई

Thane Assault Case : ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर गुन्हा; 14 तासांनंतर पोलिसांची कारवाई

0
Thane Assault Case : ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर गुन्हा; 14 तासांनंतर पोलिसांची कारवाई

ठाणे : ठाण्यातील (Thane) ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणानंतर संबंधित कॅब चालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. (Thane Assault Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॅब चालकाचे नाव निशांत धर शुक्ला असे आहे. मारहाण झालेल्या वृद्ध दाम्पत्याने स्वतः तक्रार दाखल न केल्याने शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी फिर्यादी बनून वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

https://prahaar.in/2026/06/11/stand-up-comedian-pranit-more-has-shut-down-his-own-instagram-account/

या प्रकरणाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मिळालेल्या माहितीनुसार, ज्युपिटर रुग्णालयाजवळून एक वयोवृद्ध दाम्पत्य पायी जात असताना आरोपी चालकाने त्यांच्या समोर रस्त्यावर थुंकले. यावेळी वृद्धाने त्याला रस्त्यावर थुंकू नये, असा सल्ला दिला. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने हातातील दगडाने वृद्धावर हल्ला केला. या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/11/metal-pins-found-in-birthday-cake-in-thane-metal-pins-discovered-in-a-themed-birthday-cake-in-thane-a-3-year-old-boy-swallowed-two-metal-pins-along-with-the-cake/

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले आणि वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here