Home ब्रेकिंग न्यूज TMC : तृणमूलच्या १९ बंडखोर खासदारांच्या यादीत शत्रुघ्न सिन्हांसह माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही

TMC : तृणमूलच्या १९ बंडखोर खासदारांच्या यादीत शत्रुघ्न सिन्हांसह माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही

0
TMC : तृणमूलच्या १९ बंडखोर खासदारांच्या यादीत शत्रुघ्न सिन्हांसह माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणही

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) २८ पैकी १९ बंडखोर लोकसभा खासदारांच्या यादीत एक धक्कादायक नाव समोर आले आहे. बंडखोरांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना जे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे, त्यावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव आहे. ही यादी समोर आल्यानंतर नवी दिल्लीपासून कोलकातापर्यंतच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, या यादीत १९ नावांचा समावेश आहे. या यादीत युसूफ पठाण आणि सायोनी घोष यांचीही नावे आहेत.

https://prahaar.in/2026/06/10/service-to-the-people-is-the-true-spiritual-practice-prime-minister-modi/

यादीत ‘शॉटगन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह नुकतेच चर्चेत आलेले माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण, पार्थ भौमिक, काकोली घोष दस्तीदार, बापी हलदर, सायोनी घोष, रचना बॅनर्जी, असित मॉल, के. रहमान, शर्मिला सरकार आणि मिताली बाग यांच्या नावांचाही समावेश आहे.

https://prahaar.in/2026/06/10/devendra-fadnavis-the-journey-from-a-capable-india-to-a-developed-india-is-possible-only-because-of-prime-minister-modi/

शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल), काकोली घोष (बारासात), सायोनी घोष (जादवपुर),जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार),खलील उर रहमान (जंगीपुर),युसूफ पठाण (बहरामपूर), अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद), पार्थ भौमिक (बॅरकपूर),बापी हलदार (मथुरापूर),माला रॉय (कोलकाता दक्षिण), कालीपद सोरेन (झाडग्राम),मिताली बाग (आरामबाग), दीपक अधिकारी (घाटल), जून मालिया (मेदिनीपूर), अरूप चक्रवर्ती (बांकुडा), शर्मिला सरकार (बर्धमान पूर्व), असित कुमार मॉल (बोलपूर), शताब्दी रॉय (बीरभूम), रचना बॅनर्जी (हुगळी).

https://prahaar.in/2026/06/10/prime-minister-modis-place-in-the-creation-of-a-new-india-is-unshakable/

तृणमूल काँग्रेसची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याच्या काही दिवस आधीच राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनीही राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दोन्ही नेत्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा करताना पक्ष नेतृत्वाशी असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सायोनी घोष यांचे नावही आता या यादीत आले आहे. सातत्याने होणाऱ्या या राजीनाम्यांमुळे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर आणि येत्या दिवसांत आणखी कोणते नेते पाऊल उचलणार का, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

https://prahaar.in/2026/06/10/another-setback-for-mamata-banerjee-trinamool-congress-mp-sushmita-dev-resigns/

२० खासदार सोबत असल्याचा काकोली घोष दस्तीदार यांचा दावा

यापूर्वी बंडखोर गटाचे नेतृत्व करणाऱ्या लोकसभा सदस्य काकोली घोष दस्तीदार यांनी दावा केला होता की, पक्षाच्या २० खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. दस्तीदार यांनी तेव्हा म्हटले होते, “माझ्या संमेत टीएमसीच्या जवळपास वीस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एनडीएला (NDA) अधिकृतपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर असा युक्तिवाद करणार आहेत की, दस्तीदार या लोकसभेत पक्षाच्या मुख्य प्रतोद (Chief Whip) राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here