Home महत्वाची बातमी Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

0
Fire Station : चांदिवलीमध्ये अग्निशमन दलाची होणार उभारणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

चांदिवली (Chandiwali)  येथे नव्याने अग्निशमन केंद्र (Fire station) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात आगीसारख्या घटना घडल्यास आग विमोचनाचे काम करणे जवानांना त्वरीत शक्य होणार आहे.

https://prahaar.in/2026/06/10/a-romantic-relationship-ends-in-bloodshed-girlfriend-murdered-after-insisting-on-marriage-attempt-made-to-destroy-evidence-by-burning-the-body/

चांदिवली येथे, लेक होम प्रायवेट मार्गाच्या समोर, चांदिवली फार्म मार्गा लगत असलेल्या न.भूमापन. क्र. ३६/१ (बी), ३६/१ (सी) येथे अग्निशमन केंद्राचे बांधकाम करून येथील जनतेला ही सुविधा देण्यात येणार आहे. जागा ही अग्निशमन / समादेश केंद्र करीता आरक्षित असल्याने यावर महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाचे उभारण्यात येत आहे. या भूखंडाचे एकुण क्षेत्रफळ ७५७.९० चौ.मी एवढे असून मुंबई अग्निशमन दल यांच्या मागणीनुसार अग्निशमन कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवानिवास इमारतीचे बांधकाम आणि प्रशिक्षण मनो-याचे बांधकाम आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे. सहा मजल्यांच्या या अग्निशमन केंद्राच्या बांधकामांसाठी निविदा मागवण्यात आली होती.

https://prahaar.in/2026/06/10/school-reopening-date-schools-in-vidarbha-to-reopen-from-june-22-education-departments-major-decision-due-to-heat/

यामध्ये एम.एम.एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या बांधकामासाठी विविध करांसह २२.७३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी संरचनात्मक सल्लागार म्हणून नयन ढोलकिया यांची निवड करण्यात आली. त्यांना सुमारे १९ लाख रुपये सल्लागार सेवा शुल्क म्हणून अदा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here