– ‘सिल्व्हर पापलेट’सह इतर प्रजातींच्या उत्पादनात होणार वाढ
मुंबई : राज्यातील मत्स्य साठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादन वाढीसाठी दरवर्षी लागू असणारा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आणखी १६ दिवसांनी वाढवण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू आहे. सध्या ६१ दिवसांची असणारी ही बंदी ७६ दिवसांपर्यंत नेल्यास समुद्रातील माशांच्या प्रजोत्पादनाला मोठा वाव मिळेल आणि परिणामी राज्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ होईल, असे सूतोवाच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका मुलाखतीत केले आहे. शासनाच्या या प्रस्तावित निर्णयाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम कोकण किनारपट्टीवरील अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘सिल्व्हर पापलेट’सह इतर प्रमुख माशांच्या प्रजातींच्या उत्पादन वाढीवर होणार आहे.
https://prahaar.in/2026/06/10/gujarat-congress-news-major-setback-for-congress-in-gujarat-the-party-will-not-have-a-single-mp-in-the-rajya-sabha/
https://prahaar.in/2026/06/10/dadar-road-accident-%e2%82%b92-lakh-aid-for-the-family-of-the-youth-injured-in-the-dadar-accident/
नेमकी गरज का?
गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील बदलणारे हवामान, वाढती चक्रीवादळे आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे १ ऑगस्टनंतरही मच्छीमारांना समुद्रात जाणे अनेकदा शक्य होत नाही. दुसरीकडे, जगभरातील अनेक प्रमुख सागरी देश आणि भारतामधील शेजारील गुजरात राज्याने निसर्ग संवर्धन आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी ७६ दिवसांची बंदी यशस्वीरीत्या लागू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही बंदीचा कालावधी ७६ दिवस (१ जून ते १५ ऑगस्ट) करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. (Nitesh Rane)