भाईंदर : भाईंदर (Bhayandar) पूर्व परिसरातील खारफुटीच्या जंगलात सापडलेल्या जळालेल्या आणि कुजलेल्या मृतदेहाच्या (Deathbody) प्रकरणाचा नवघर पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन सख्ख्या भावांना अटक (Attack) केली असून पैशांच्या वादातून ही हत्या (Murder) झाल्याचे तपासात समोर आले आहे. (Bhayandar crime)
मिळालेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी सायंकाळी सचिन तेंडुलकर मैदानासमोरील खारफुटीच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळावर कोणतेही ओळखपत्र किंवा अन्य वस्तू सापडल्या नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
https://prahaar.in/2026/06/10/dadar-road-accident-%e2%82%b92-lakh-aid-for-the-family-of-the-youth-injured-in-the-dadar-accident/
दरम्यान, आसपासच्या पोलीस ठाण्यांमधील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासताना 1 जून रोजी हरवल्याची तक्रार दाखल झालेल्या गौरव विजयप्रकाश बदसर (वय 25) या तरुणाशी मृतदेहाचा संबंध असल्याचा संशय आला. सायबर तपास आणि कुटुंबीयांकडून ओळख पटवल्यानंतर मृतदेह गौरवचाच असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. चौकशीत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीनंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
https://prahaar.in/2026/06/10/horrific-accident-on-navale-bridge-in-pune-cement-tanker-overturns-onto-a-two-wheeler-youth-dies-on-the-spot/
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि गौरव यांच्यात पैशांच्या व्यवहारातून जुना वाद होता. या वादातूनच तिघांनी गौरवच्या हत्येचा कट रचला. त्यांनी गौरवला दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत नेले. तो नशेत गेल्यानंतर त्याला निर्जन खारफुटी भागात नेऊन चाकूने वार करत ठार मारल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.