Home ब्रेकिंग न्यूज Lalbaug, Parel : लालबाग, परळ मधील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडाने १२ वर्षांनी घेतला मोकळा श्वास

Lalbaug, Parel : लालबाग, परळ मधील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडाने १२ वर्षांनी घेतला मोकळा श्वास

0
Lalbaug, Parel : लालबाग, परळ मधील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडाने १२  वर्षांनी घेतला मोकळा श्वास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या एफ (दक्षिण) विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत मेघवाडी, लालबाग, परळ परिसरातील शाळा व मनोरंजन मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील ४ बांधकामांवर मंगळवारी ९ जून २०२६ रोजी कारवाई करण्यात आली . हा भूखंड मोकळा करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यामुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल.

https://prahaar.in/2026/06/09/the-golden-age-of-sarabjot-lakshita-akhil-and-sakshi/

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (एफ दक्षिण विभाग) वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

https://prahaar.in/2026/06/09/dadar-best-accident-1-dies-6-injured/

विकास नियोजन आराखडा-२०३४ नुसार, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील रिक्त भूभाग क्रमांक १/११८, १ बी/११८, २/११८, ३/११८, ४/११८ आणि ७/११८ हे मनोरंजन मैदान आणि महानगरपालिका शाळा या सार्वजनिक उद्देशाने राखीव करण्यात आले आहे. या एकूण भूखंडाचे ७ हजार ८७२.१४ चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. त्यापैकी सुमारे २७४ चौरस मीटर क्षेत्रफळावर १३ रिक्त भूखंडधारक भाडेकरू वास्तव्यास होते. सदर भाडेकरू तसेच बांधकाम धारकांना महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार, पर्यायी सदनिका किंवा स्थानिक सिद्ध गणक दरानुसार (रेडी रेकनर रेट) आर्थिक मोबदला यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याबाबत कळविण्यात आले होते. या अनुषंगाने, संबंधित बांधकामे रिक्त करण्याबाबत त्यांना रितसर कळविण्यात आले होते.

https://prahaar.in/2026/06/09/subway-from-gaymukh-to-fountain-hotel/

या एकूण १३ बांधकामांपैकी ०७ बांधकामे हटवण्यात आली आहे. तसेच , उर्वरित ०६ बांधकामांवर कारवाई लवकरच करण्यात येईल. हा भूखंड मोकळा करण्यासाठी मागील १२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यामुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होईल.

अतिक्रमण निर्मूलनाची ०२ जेसीबी, ०१ डंपर ०१ रुग्णवाहिका आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४५ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here