Home देश NIA Raids : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएचे १८ ठिकाणी छापे

NIA Raids : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएचे १८ ठिकाणी छापे

0
NIA Raids : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएचे १८ ठिकाणी छापे
nia

नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएने पंजाब आणि हरियाणात एकूण अठरा ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीशी लागेबांधे असलेल्यांना शोधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

डिजिटल उपकरणांच्या सहकार्याने एकमेकांच्या संपर्कात राहणे, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि संवेदनशील माहितीची देवाणघेवाण या प्रकरणी एनआयएने ही कारवाई केली. छापे टाकून एनआयएने अनेक डिजिटल उपकरणे तसेच कागदपत्रे जप्त केली. या जप्तीमधून भारतविरोधी षडयंत्राचा सुगावा लागल्याचे समजते. या प्रकरणात पुढील चौकशीसाठी काही जणांना एनआयए कार्यालयात हजर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच या प्रकरणात धरपकड होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/06/09/ind-vs-ire-mohammed-siraj-out-of-the-series-against-ireland/

एनआयएच्या आतापर्यंतच्या तपासात, पंजाबच्या जालंधर येथील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रॉजर संधूच्या निवासस्थानावर मार्च २०२५ मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे शहजाद भट्टीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, एनआयएने भट्टी आणि या प्रकरणातील आणखी एका आरोपीविरुद्ध फरार म्हणून आरोपपत्र दाखल केले होते.

सिरसा प्रकरणात, एनआयएने मे २०२६ मध्ये भट्टी आणि पाकिस्तानस्थित दुसरा हँडलर, सोहेल अहमद उर्फ ​​सोहेल बलोच याच्यासह नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.बलदेव नगर पोलीस ठाण्यातील प्रकरण एका कार बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे, ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपींपैकी एक जण भट्टीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.एनआयएचा तीन प्रकरणांमधील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here