Home ताज्या घडामोडी Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

0
Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी (LPG Gas) गॅस अनुदानाबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे. योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित सिलेंडरच्या संख्येत कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून (Central Goverment) अधिकृत घोषणा झालेली आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ujjawala scheme)

उज्ज्वला योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. या योजनेमुळे देशातील कोट्यवधी महिलांना धुराच्या चुलीपासून दिलासा मिळाला असून एलपीजी गॅसचा वापर वाढला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किमतीत झालेली वाढ आणि तेल कंपन्यांवरील आर्थिक ताण यामुळे अनुदान व्यवस्थेचा आढावा घेतला जात असल्याची चर्चा आहे. काही वृत्तांमध्ये लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानित सिलेंडरच्या संख्येत बदल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी ९ सिलेंडरचे अनुदान मिळत होते, पण आता फक्त ४ सिलेंडरसाठीच ३०० रुपये अनुदान मिळेल.

https://prahaar.in/2026/06/09/global-stock-markets-positive-signals-from-global-markets-asian-markets-bullish/

सध्या देशभरात उज्ज्वला योजनेचे १० कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. त्यामुळे या योजनेतील कोणताही बदल लाखो कुटुंबांवर परिणाम करू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांचे घरगुती बजेट आणि स्वयंपाकाचा खर्च यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, अनुदानाबाबत कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतरच वास्तविक स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here