घरच्याघरी टॅनिंगवर करा हे सोपे उपाय

घरच्या घरी काही सोप्या उपायांनी त्वचेचा नैसर्गिक उजाळा परत मिळवा.

काकडीचा रस चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा शांत होते आणि सूर्यामुळे आलेला काळेपणा कमी होतो

दही, बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून लावा. हा पॅक त्वचेवरील मृत पेशी काढतो.

टोमॅटोतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा रंग सुधारण्यास आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करतात

बटाट्याच्या कापांनी किंवा रसाने मसाज केल्यास त्वचेवरील डाग आणि टॅनिंग कमी होऊ शकते.

अलोवेरा जेल रोज रात्री लावल्यास त्वचेला पोषण मिळते आणि टॅनिंग हळूहळू कमी होते.

बाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लावा