Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Local Train Mega Block : पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा

Mumbai Local Train Mega Block : पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा

0
Mumbai Local Train Mega Block : पश्चिम, हार्बर आणि मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा
Mega Block Harbour

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे प्रशासनाकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वे (Western Railway), हार्बर रेल्वे (Harbour Railway) आणि मध्य रेल्वे (Central Railway) मार्गांवर विशेष मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल ट्रेन (Local Train) फेऱ्या रद्द होणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक (Schedule) तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हार्बर रेल्वे (Harbour Railway)

– स्थानक (Station) : सीएसएमटी (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रे
– मार्ग (Route) : अप (Up) आणि डाऊन (Down)
– वेळ (Time) : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

https://prahaar.in/2026/06/07/multi-tunneling-mumbai-a-network-of-tunnels-will-be-built-in-mumbai-expected-cost-of-rs-4392-crores/

ब्लॉकच्या कालावधीत हार्बर मीर्गावरील सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या (Local Services) रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक ८ वरून दर २० मिनिटांनी विशेष लोकल (Special Local) चालवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील काही गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावू शकतात.

मध्य रेल्वे (Central Railway)

– स्थानक (Station) : सीएसएमटी ते विद्याविहार
– मार्ग (Route) : अप आणि डाऊन धीमा मार्ग (Slow Line)
– वेळ (Time) : शनिवारी मध्यरात्री १२.०५ ते रविवारी पहाटे ५.०५

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्ग (Fast Line) वरून वळवण्यात येतील. तसेच जलद लोकल गाड्या परळ (Parel), माटुंगा (Matunga) आणि शीव (Sion) स्थानकांवर अतिरिक्त थांबा घेतील. देखभाल कामांमुळे रात्री उशिरा आणि पहाटेच्या काही फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

https://prahaar.in/2026/06/07/the-mithi-river-the-mithi-river-embankment-is-only-for-the-construction-of-a-protective-wall/

पश्चिम रेल्वे (Western Railway)

– स्थानक (Station) : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
– मार्ग (Route) : अप आणि डाऊन धीमा मार्ग (Slow Line)
– वेळ (Time) : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

पश्चिम रेल्वेवर ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील. चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या काही फास्ट लोकल (Fast Local) गाड्या दादर आणि वांद्रेपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहतील, तर काही गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले असून, मेगा ब्लॉक लक्षात घेऊन पर्यायी प्रवास व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here