मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तानमधील एकमेव कसोटी सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाबाद १०३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्याने पटकावला.टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या दिवशीच तीनशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. केएल राहुलच्या शतकानंतर गिलनेही जबाबदारीने खेळत मोठी धावसंख्या उभारल्यामुळे भारताने तीन बाद 368 धावा केल्या.शुभमन गिलने शतकासह कसोटी कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा पार केला.
https://prahaar.in/2026/06/06/ind-vs-afg-gill-rahuls-centuries-strengthen-indias-grip-on-afghanistan-368-3-on-the-first-day/
अवघ्या 351 दिवसांत 1000 धावा
विशेष म्हणजे गिलने कर्णधार म्हणून फक्त 351 दिवसांत 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत हा टप्पा गाठणारा तो पहिलाच कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इतर दिग्गजांच्या नावावर होता. कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांत 1000 धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने हा टप्पा 15 डावांत पूर्ण केला, तर सुनील गावस्कर यांनी 14 डावांत हा पराक्रम केला होता.
दिग्गजांना टाकलं मागे !
अफगाणिस्तानविरुद्ध झळकावलेले शतक हे गिलच्या कारकिर्दीतील कर्णधार म्हणून सहावे कसोटी शतक ठरले आहे. यासह त्याने एमएस धोनी, सौरव गांगुली आणि मन्सूर अली खान पतौडी यांना मागे टाकले. या तिघांच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी 5 कसोटी शतके आहेत.
https://prahaar.in/2026/06/06/ind-vs-afg-big-blow-to-team-india-virat-kohli-out-of-odi-series-against-afghanistan-yasavi-jaiswal-gets-chance/
कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके करणारे भारतीय
1. विराट कोहली – 20 शतके
2. सुनील गावस्कर – 11 शतके
3. मोहम्मद अझरुद्दीन – 9 शतके
4. सचिन तेंडुलकर – 7 शतके
5. शुभमन गिल – 6 शतके