Home मनोरंजन नाट्यपट रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण…

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण…

0
रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण…
satish rajwade

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. नुकताच या नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे रंगला होता. नाटक सुरू झाल्यानंतर काही ज्येष्ठ प्रेक्षक उशिरा नाट्यगृहात पोहोचले आणि त्यांच्या आसनव्यवस्थेमुळे प्रयोगात थोडासा व्यत्यय निर्माण झाला. मात्र यावेळी घडलेली एक गोष्ट उपस्थित रसिकांच्या कायम स्मरणात राहील अशी ठरली.

https://prahaar.in/2026/06/06/the-fort-owners-the-fort-owners-took-a-boat-trip-along-the-mithi-river-they-showed-three-feet-of-silt-and-garbage-in-the-river/

नाटक रंगात आले होते. कथानकाने प्रेक्षकांची पकड घ्यायला सुरुवात केली होती. अशा वेळी उशिरा आलेल्या ज्येष्ठ प्रेक्षकांना जागा शोधण्यात अडचण येत असल्याचे लक्षात येताच अभिनेता-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी तत्काळ नाटक थांबवले. त्यांनी तंत्रज्ञांना सभागृहातील दिवे सुरू करण्यास सांगितले आणि सर्व ज्येष्ठ प्रेक्षक व्यवस्थित बसून स्थिरावत नाहीत तोपर्यंत प्रयोग पुढे सुरू केला नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रसंगात त्यांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळली. प्रेक्षक आरामात बसल्यानंतरच त्यांनी पुन्हा नाटकाला सुरुवात केली. राजवाडे यांचा हा संवेदनशील आणि सौजन्यशील पैलू पाहून रसिक भारावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here