Home ब्रेकिंग न्यूज Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Kolhapur Fox Attack

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता कागल तालुक्यात एका कोल्ह्याने (Fox) नागरिकांची झोप उडवली आहे. बिबट्या, गवा आणि टस्करनंतर आता कोल्ह्याच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोल्ह्याने आतापर्यंत ११ जणांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/06/06/devendra-fadnavis-the-insistence-on-naming-navi-mumbai-airport-after-loknete-d-ba-patil-continues/

कागल तालुक्यातील बोरवडे-मालवे परिसरातील मगदूम वसाहतीत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. संजय चव्हाण आणि त्यांची पत्नी घराजवळ काम करत असताना त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा शर्विल अंगणात खेळत होता. त्याचवेळी अचानक आलेल्या कोल्ह्याने शर्विलच्या उजव्या पायाचा चावा घेतला. हल्ल्यानंतर जखमी शर्विलला तातडीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने त्याच्यावर वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हा कोल्हा केवळ मगदूम वसाहतीपुरता मर्यादित नसून मालवे आणि सरवडे परिसरातही फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या कोल्ह्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करून या कोल्ह्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here