Home क्रीडा वैभव सूर्यवंशीसाठी मोठी संधी! इंडिया ए ट्राय सीरिजचे सामने लाईव्ह पाहता येणार

वैभव सूर्यवंशीसाठी मोठी संधी! इंडिया ए ट्राय सीरिजचे सामने लाईव्ह पाहता येणार

0
वैभव सूर्यवंशीसाठी मोठी संधी! इंडिया ए ट्राय सीरिजचे सामने लाईव्ह पाहता येणार

इंडिया ए (India A Cricket Team), श्रीलंका ए आणि अफगाणिस्तान ए यांच्यात होणाऱ्या वनडे ट्राय सीरिजला ९ जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागले असून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या सहभागामुळे या मालिकेची उत्सुकता आणखी वाढली आहे. वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन स्पर्धेतील सर्व सामने थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ट्राय सीरिजमध्ये फायनलसह एकूण ७ सामने खेळवले जाणार आहेत. भारत ए संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपवण्यात आले आहे. स्पर्धेतील सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनी लिव्ह अॅपवर थेट पाहता येणार आहेत.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत ७७६ धावा केल्या होत्या. त्याच्या शानदार प्रदर्शनामुळे त्याला ऑरेंज कॅपसह अनेक वैयक्तिक पुरस्कारही मिळाले. त्यामुळे आता ट्राय सीरिजमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

https://prahaar.in/2026/06/06/dris-big-action-522-kg-of-ganja-seized-drug-smuggling-worth-rs-2-61-crores-exposed/

स्पर्धेतील पहिला सामना ९ जून रोजी भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात होणार आहे. त्यानंतर भारत ए संघ ११ जूनला अफगाणिस्तान ए, १५ जूनला पुन्हा श्रीलंका ए आणि १७ जूनला अफगाणिस्तान ए विरुद्ध मैदानात उतरणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होतील.

या वनडे मालिकेनंतर २५ जूनपासून भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. तसेच दोन्ही संघांदरम्यान टी-२० मालिका होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

भारत ए संघात तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बदोनी, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र, यश ठाकूर, अंशुल कंबोज आणि इतर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here