कांगपोकपी : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील सैतु-गाम्फाजोल उपमंडळातील लोइबोल खुल्लेन गावात शुक्रवार ५ जून २०२६ रोजी पहाटे हिंसाचार उसळला. या हिंसाचारात एक महिला, तिचा पती आणि एक अन्य व्यक्ती अशा तीन जणांची हत्या झाली. सशस्त्र हल्लेखोरांनी तिघांची हत्या केली. तसेच हल्लेखोरांनी काही घरांना आग लावली. एकूण सात घरं जळून खाक झाली.
https://prahaar.in/2026/06/05/monsoon-2026-good-news-monsoon-has-reached-goa/
दोन गटांच्या हिंसक संघर्षाची तीव्रता वाढू लागल्याचे बघून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात लपून राहणे पसंत केले. गावात काही काळानंतर शांतता पसरली. यानंतर धाडस करून पुढे आलेल्या स्थानिकांनी हत्या झालेल्या तिघांची ओळख पटवली आहे. लेतखोंगाम हाओकिप, टिनमेरी हाओकिप आणि जांगमिनलाल हाओकिप यांची हत्या झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
https://prahaar.in/2026/06/05/pradhan-mantri-matri-vandana-yojana/
गावातील हिंसेचा कुकी इनपी मणिपूर (केआयएम) या संघटनेने जाहीर निषेध केला आहे. मारेकऱ्यांना शोधून अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी मागणी केआयएमने (KIM) केली आहे. निरपराध आणि निःशस्त्र व्यक्तींवर हल्ला करणे आणि त्यांची हत्या करणे हे निषेधार्ह कृत्य आहे. या कृत्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. सामान्यांची हत्या करणारे मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहेत, असेही कुकी इनपी मणिपूर (केआयएम) या संघटनेने सांगितले.