Home ब्रेकिंग न्यूज Bal Mane : पदाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी देखील विनायक राऊत पैसे घेतात!

Bal Mane : पदाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी देखील विनायक राऊत पैसे घेतात!

0
Bal Mane : पदाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी देखील विनायक राऊत पैसे घेतात!
Bal Mane On Vinayak Raut

बाळ माने यांचा गंभीर आरोप; मी संघ स्वयंसेवक, कोकणहिताचा निर्णय घेणार

मुंबई : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर उबाठा गटातून हकालपट्टी झालेले माजी आमदार बाळ माने यांनी आता या गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “कोकणात उबाठा गटाची वाट लावण्याचे काम विनायक राऊत यांनीच केले असून, ते स्वतःच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पत्र देण्यासाठी देखील पैसे घेतात,” असा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी आपल्यावर केलेल्या ‘गद्दार’ या टीकेचा खरपूस समाचार घेताना, “पालघर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘फर्न हॉटेल’मध्ये एक मोठी डील झाली होती, त्यात तुम्ही नक्की किती पैसे खाल्ले हे आधी कोकणातील जनतेला सांगा,” असे आव्हानच बाळ माने यांनी दिले आहे.

https://prahaar.in/2026/06/05/pune-lpg-cylinder-blast-kharadi/

माध्यमांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीतही विनायक राऊत यांना मला उमेदवारी द्यायची नव्हती, कारण त्यांना अन्य लोकांसोबत ‘सेटिंग’ करायची होती. काल ते डोमकावळ्यासारखे आले आणि माझ्यावर टीका करू लागले; पण त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकारच काय? मी जर काही चुकीचे केले होते, तर पक्षाने मला बोलावून वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. मात्र, विनायक राऊत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ‘भाट’ झाले आहेत. कोकणात शिंदे सेनेला आव्हान देणारा सक्षम नेता उबाठा गटात त्यांना नको आहे, म्हणूनच त्यांनी माझ्या विरोधात शिंदे गटाची छुपी सुपारी घेतली आहे,” असा गंभीर आरोप माने यांनी केला.

https://prahaar.in/2026/06/05/aarey-colony-tree-plantation-drive-5-lakh-trees/

मी ‘आरएसएस’चा स्वयंसेवक, फडणवीसांचा शब्द मानला

आपल्या माघारीमागचे कारण स्पष्ट करताना बाळ माने म्हणाले, “मी मूळचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे १९९० पासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. या निवडणुकीत मंत्री नितेश राणे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी संपर्क साधला. महाविकास आघाडीकडे केवळ ५५ मते असताना निवडणुकीत उभे राहून स्वतःचे राजकीय करिअर का संपवतोस? असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांच्या या शब्दाचा मान राखूनच मी माघार घेतली. फडणवीस यांनी मला सन्मानाने बोलावले तर मी निर्णय घेईन. आता यापुढेही मी फडणवीस यांचेच ऐकणार असून सत्ताधारी पक्षात राहून कोकणच्या हिताचे निर्णय घेणार आहे”, असे माने यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here