महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याचा सहकारी ‘राणा भाई’ यांच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. राज्यभर सुरू असलेल्या विशेष तपास मोहिमेचा भाग म्हणून एटीएसने श्रीरामपूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. (Shrirampur ATS Raid)
सात ते आठ ठिकाणी छापे :
https://prahaar.in/2026/06/04/on-one-hand-trying-to-be-a-peace-envoy-on-the-other-hand-closeness-to-an-enemy-country-did-pakistan-provide-secret-information-about-iran-to-the-us/
सोशल मीडियाद्वारे संपर्काचे धागेदोरे :
प्राथमिक तपासात पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय युवकांशी संपर्क साधत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीही महाराष्ट्र एटीएसने राज्यातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या तपास मोहिमा राबवत ५० हून अधिक व्यक्तींची चौकशी केली होती.
तपास यंत्रणांच्या मते, सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप्स आणि ऑनलाइन नेटवर्किंगच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता तपासली जात आहे. या माध्यमांचा वापर करून काही व्यक्तींना बेकायदेशीर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे. (Shrirampur ATS Raid)
रेकी केल्याचा संशय :
तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पाकिस्तानातून मिळालेल्या कथित सूचनांच्या आधारे काही विशिष्ट ठिकाणांची आणि व्यक्तींच्या घरांची रेकी (पाहणी) करण्यात आल्याची माहिती एटीएसला मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी संशयितांकडे चौकशी सुरू असून, त्यांच्या डिजिटल संवादांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत तपशील किंवा संभाव्य लक्ष्यांविषयी कोणतीही माहिती एटीएसने अद्याप सार्वजनिक केलेली नाही. (Shrirampur ATS Raid)
https://prahaar.in/2026/06/04/pune-news-the-leader-of-the-ghaywal-gang-has-finally-been-arrested-pune-police-takes-major-action-in-rajasthan/
राज्यभरात विशेष मोहीम :
शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कची व्याप्ती आणि त्याचे महाराष्ट्रातील संभाव्य संपर्क शोधण्यासाठी एटीएसने राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, नांदेड, अकोला आणि इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या चौकशा आणि छापेमाऱ्या करण्यात आल्या आहेत. तपास यंत्रणांचा मुख्य भर पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्क, त्यांचे ऑनलाइन संपर्क आणि महाराष्ट्रातील संभाव्य सहकाऱ्यांचा शोध घेण्यावर आहे. (Shrirampur ATS Raid)
डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू :
दरम्यान, चौघांवर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे का, त्यांना अधिकृत अटक करण्यात आली आहे का किंवा त्यांच्याविरोधात कोणती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, याबाबत एटीएसकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shrirampur ATS Raid)