Home ब्रेकिंग न्यूज Model Divyanshu Joshi Died : फोटोशूट ठरलं जीवघेणं! केरळमध्ये मॉडेल दिव्यांशू जोशीचा पाण्यात बुडून मृत्यू

Model Divyanshu Joshi Died : फोटोशूट ठरलं जीवघेणं! केरळमध्ये मॉडेल दिव्यांशू जोशीचा पाण्यात बुडून मृत्यू

0
Model Divyanshu Joshi Died : फोटोशूट ठरलं जीवघेणं! केरळमध्ये मॉडेल दिव्यांशू जोशीचा पाण्यात बुडून मृत्यू
Model Divyanhu Joshi Died

मुंबई  (Model Divyanshu Joshi Died ) : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील २६ वर्षीय मॉडेल दिव्यांशू जोशी याचा केरळमध्ये फोटोशूटदरम्यान (Photoshoot) पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ मे रोजी एर्नाकुलम जिल्ह्यातील एका बंद पडलेल्या खाण परिसरात घडली असून, या दुर्घटनेमुळे मॉडेलिंग (Modeling) क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांशू जोशी (Divyanshu Joshi) एका प्रोजेक्टच्या शूटसाठी (Shoot) दिल्लीहून केरळमध्ये आला होता. फोटोशूटसाठी त्याने आणि त्याच्या मित्रांनी एर्नाकुलममधील एका जुन्या खाण परिसराची निवड केली होती. मात्र, ही खाण गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून बंद असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथे प्रवेशासही बंदी आहे.

https://prahaar.in/2026/06/04/shocking-incident-in-mira-road-mothers-boyfriend-kills-4-year-old-child/

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, फोटोशूटदरम्यान दिव्यांशू खाणीतील पाण्यात उतरला असताना त्याचा तोल गेला किंवा पाय घसरला असावा. काही क्षणांतच तो खोल पाण्यात बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी तातडीने स्थानिक नागरिकांकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

https://prahaar.in/2026/06/04/statewide-protest-by-obcs-on-june-12/

आपत्कालीन संदेश मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ३० फूट खोल खड्ड्यातून दिव्यांशूला बाहेर काढण्यात आले आणि त्याला पेरुंबावूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, या खाणीत यापूर्वीही अनेक अपघात आणि मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. काही ठिकाणी पाण्याची खोली १०० फुटांपर्यंत असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या खाणीच्या एरियल व्हिडिओंमुळेच फोटोशूटसाठी या ठिकाणाची निवड करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here