मीरा रोड : मीरा रोड परिसरात चार वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्या आईच्या प्रियकराने कथितपणे हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या निर्घृण हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात संशयाच्या आधारे शंभू शर्मा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई शंभू शर्मा याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live-in Relationship) राहत होती. प्राथमिक तपासात आरोपीने घरात असताना मुलावर अमानुषपणे हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
https://prahaar.in/2026/06/04/massive-fire-breaks-out-in-icu-of-private-hospital-in-bihar-four-patients-die-death-toll-feared-to-rise/
पोस्टमार्टेम (Post-Mortem) अहवालातून उघड झाले धक्कादायक सत्य
पंचनामा करताना पोलिसांना मुलाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या. यानंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी (Post-Mortem) पाठवण्यात आला. पोस्टमार्टेम अहवालात गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे हत्येचा संशय अधिक बळावला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/06/04/best-bus-accident-in-malad-multiple-vehicles-hit-traffic-congestion-on-highway/
तपासादरम्यान पोलिसांनी शंभू शर्माला ताब्यात घेतले असता त्याने मुलाला मारहाण केल्याची कबुली दिली. मंगळवारी (२ जून) त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलावर हल्ला का केला आणि या घटनेची माहिती मुलाच्या आईला होती का, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.