मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हरेश्वर पाटील हे मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून दहिसरमधील तत्कालिन प्रभाग क्रमांक १२८ मधून सन १९८५ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, सन १९९२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १६५ मधून आणि सन १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १५९ महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सन १९९६- ९७ मध्ये ते स्थायी समिती अध्यक्ष होते. सन १९८८- ८९ अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष होते. तसेच, सन १९९९ ते २००२ या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी काम केले.
https://prahaar.in/2026/06/03/drain-cleaning-will-be-accomplished-through-coordination-among-the-railways-the-bmc-and-elected-representatives-says-dy-mayor-sanjay-ghadi/
हरेश्वर पाटील यांच्या सुनबाई योगिता पाटील ( भाजप) या प्रभाग ८ मधून यावेळच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या पत्नी चार वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थान असलेल्या लक्ष्मण टाॅवर, डी मार्ट जवळ, लिंक रोड दहिसर ( पश्चिम) येथून काढण्यात आली. त्यानंतर दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
https://prahaar.in/2026/06/03/wipro-after-tcs-corporate-jihad-also-in-wipro/
हरेश्वर पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी १६ प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण सुरू करून त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचे प्रयत्न केले. हरेश्वर पाटील हे महापालिकेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य असताना समित्यांच्या सभांच्या कामकाजात आस्थापूर्वक भाग घेत असत. त्यांचा अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. तसेच, त्यांचे सर्व राजकीय पक्षांशी, नेत्यांशी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चांगले संबंध होते.
https://prahaar.in/2026/06/03/anti-hand-kiln-campaign-gains-momentum-goods-worth-1-5-crore-seized/
पाटील महापौर असताना मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्याने सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र ते महापौर असतानाच सदर जळालेल्या सभागृहाचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुंबईतील डांबरी रस्त्यांनी कात टाकायला सुरुवात केली. मुंबईत अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या कामाला गती मिळाली. तसेच, महापालिकेच्या १६ प्रभाग समित्यांची निर्मिती करण्यात आली. के/पूर्व विभागासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधणी, प्रबोधनकार ठाकरें नाट्यगृह निर्मिती करण्यात आली.
https://prahaar.in/2026/06/03/pune-crime-three-children-testify-in-court-in-nasrapur-case/
मुंबईतील कोळीवाडे यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्र कलादालन आणि सावरकर स्मारक स्विमिंग पूलसाठी पुढाकार घेऊन काम केले. महापालिकेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रणाली अंमलात आणणारे ते पहिले महापौर होते. त्यासाठी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५२ माध्यमिक शाळांसाठी संगणक आणि संगणकीय शिक्षण उपलब्ध करून दिले.
https://prahaar.in/2026/06/03/pune-crime-news-mephedrone-worth-rs-3700-crore-seized-from-pune-340-kg-of-raw-material-seized-from-vishrantwadi/
मुंबईतील नागरिकांची वाढती तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून मुंबईला पाणीपुरवठा योजना करता येईल का ? अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यासाठी पत्रकारांसोबत कोयना धरण प्रकल्पाचा त्यावेळी दौरा केला होता. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी करता येईल का, यासाठी त्यांनी भाभा अणुशक्ती केंद्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यावेळी चर्चा करून चाचपणी केली होती.
हरेश्वर पाटील आणि सुमन कल्याणपूरकर यांना स्थायी समितीच्यावतीने श्रध्दांजली
हरेश्वर पाटील यांच्या निधनानिमित्त स्थायी समितीच्या बैठकीत शोक प्रस्ताव मांडून सभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. तसेच पद्मभुषण ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूरकर यांनाही श्रध्दांजली वाहिली. स्थायी समितीमध्ये कल्याणपूरकर यांचा शोकप्रस्ताव मांडून आदरांजली वाहण्यात आली.
हरेश्वर पाटील यांचा नगरसेवक पदाचा कालावधी : १० मे १९८५ ते ९ मार्च २००२
महापौरपदाचा कालावधी : सन १९९९-२००० ते सन २००१-०२
स्थायी समिति अध्यक्ष कालावधी : सन १९९६- ९७
सार्वजनिक आरोग्य समिति अध्यक्ष : – सन १९८८- ८१
स्थायी समिति सदस्य कालावधी : – सन १९९३- ९४ ते सन १९९६-९७
सार्वजनिक आरोग्य समिति सदस्य : – सन १९८५- ८६ ते सन १९९१-९२
शिक्षण समिति, सदस्य : सन १९९७-९८
सार्वजनिक आरोग्य समिती सदस्य – सन १९८५- ८६ ते सन १९९१-९२