महाराष्ट्रातील 11 प्रसिद्ध गणपती मंदिरे, श्रद्धा आणि भक्तीचा संगम!

गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी अरबी समुद्रकिनाऱ्यावरील हे स्वयंभू गणेश मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

रेडी गणपती मंदिर, सिंधुदुर्ग खनिज उत्खननादरम्यान सापडलेली भव्य स्वयंभू गणेश मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरते.

कडावचा बाळ दिगंबर गणपती, रायगड रायगड जिल्ह्यातील हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण श्रद्धाळूंमध्ये लोकप्रिय आहे.

हेदवी दशभुजा गणपती मंदिर, रत्नागिरी दहा हातांची दुर्मिळ गणेश मूर्ती हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, दादर नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध; दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

आंजर्ले कड्यावरचा गणपती, रत्नागिरी डोंगरमाथ्यावर वसलेले हे मंदिर निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम आहे.

टिटवाळा महागणपती मंदिर, ठाणे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाणारे प्राचीन गणेश मंदिर.

लेण्याद्री गणपती मंदिर, पुणे अष्टविनायकांपैकी एकमेव डोंगरातील गुहेत असलेले गणेश मंदिर.

ढोल्या गणपती मंदिर, सातारा कृष्णा नदीच्या काठी वसलेले भव्य आणि ऐतिहासिक गणेश मंदिर भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.

अदासा गणपती मंदिर, नागपूर 15 फूट उंच स्वयंभू गणेश मूर्तीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.

त्रिशुंड गणपती मंदिर, पुणे तीन सोंड असलेल्या दुर्मिळ गणेश मूर्तीमुळे हे मंदिर विशेष ओळखले जाते.

गणपती बाप्पा मोरया! यापैकी कोणत्या गणपतीचे दर्शन तुम्ही घेतले आहे?