Home महाराष्ट्र अहिल्यानगर Crime News : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Crime News : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

0
Crime News : समृध्दी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर लूटमार करणारी आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ( Ahilyanagar Crime News )

संशयित आरोपी ताब्यात

निखील बद्रीनारायण गोरे (वय १९, रा. नुतन वसाहत, अंबड, जि. जालना), शिवनाथ शांताराम आव्हाड (वय २४, रा. संतनगर, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, मुळ रा. जातेगांव टेमभी, ता. वैजापुर, जि. छ. संभाजीनगर), ओम बालाजी खरात (वय १९, रा.. मोतीबाग, तुलसिपार्क, भवानीनगर, ता. जि. जालना, हल्ली रा. कांचनवाडी, देवभारती हॉस्पीटल जवळ संभाजीनगर), राहुल साधाकिसन कोकाटे (वय २३, रा. पांग्रा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, मुळ रा. रांजणगांव, ता. बदनापुर, जि. जालना), साईराज गणेश शहाणे (वय – २१, रा. गोशाळा जवळ, साकुरी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ( Ahilyanagar Crime News )

https://prahaar.in/2026/06/03/selling-old-phones-as-new/

कोपरगाव ( Kopargaon ) तालुका परिसरात समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मारहाण करून लुटणारी टोळी ही जालना येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नऊ लाख २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here