Home महाराष्ट्र नाशिक Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिराचा कारभार प्रथमच धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिराचा कारभार प्रथमच धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार

0
Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिराचा कारभार प्रथमच धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार

Nashik News : शासनाच्या नवीन धोरणानुसार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचा (Nashik Trimbakeshwar Temple) कारभार प्रथमच थेट धर्मदाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी देवस्थानचे विश्वस्त धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून नेमले जात असले, तरी मंदिराचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीश, तर सचिव म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यभार पाहत असत. हे शासकीय अधिकारी अन्य विश्वस्तांना सोबत घेऊन देवस्थानचा कारभार चालवत होते.

https://prahaar.in/2026/06/02/nashik-colors-of-love-at-the-convocation-ceremony/

मुख्य सूत्रे धर्मदाय आयुक्तांकडे जाणार

त्र्यंबकेश्वर देवस्थानचा कारभार सर्वप्रथम १९९४ मध्ये न्यायाधीशांकडे (Judge) सोपवण्यात आला होता. त्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाच्या सूचनेनुसार, अध्यक्ष आणि सचिवांसह एकूण नऊ व्यक्ती विश्वस्त म्हणून मंदिराचा कारभार पाहत आहेत. मात्र, न्यायाधीशांना न्यायालयाचे नियमित काम सांभाळून देवस्थानकडे लक्ष द्यावे लागत असल्याने अनेक अडचणी येत होत्या. आता मुख्य सूत्रे थेट धर्मदाय आयुक्तांकडे जाणार असल्याने, मंदिराच्या विविध प्रलंबित कामांविषयीची निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि पर्यायाने विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Nashik Trimbakeshwar Temple)

दरम्यान, शासनाच्या या संभाव्य निर्णयावर त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थानसाठी पूर्णवेळ उपधर्मदाय आयुक्त (डेप्युटी चॅरिटी कमिशनर) नियुक्त केल्यास ते मंदिराच्या कारभारावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवू शकतील, असा एक सूर आहे. तर दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र ‘मंदिर प्राधिकरण’ स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही यापूर्वी सातत्याने झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here