मुंबई : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी भावुक पोस्ट (Post) शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुमनताईंचा आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजातील साधर्म्याचा उल्लेख करत त्यांनी एक खंतही व्यक्त केली.
या पोस्टमध्ये वैभव मांगलेनं लिहिलंय की, “ओठावरी विरला ग आसावला सूर’ सुरुवातीचा काही काळ सुमन ताई लता बाईंसारखच गातं होत्या… अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यात पटकन सांगता येत नाही की, लताबाई की सुमनताई गातायत… एक द्वंद्व गीत आहे, ते तर कानात प्राण आणून ऐकलं तरीही सांगता येतं नाही… नेमकं कुणी काय गायलंय…”
https://prahaar.in/2026/06/02/salman-khan-salman-khan-objects-to-film-titled-kala-hiran-sends-direct-legal-notice-to-producers/
वैभव मांगले यांनी म्हटलं की, सुरुवातीच्या काळात सुमन कल्याणपूर यांचा आवाज लताबाईंसारखा वाटत असल्याने अनेकदा दोघींमध्ये फरक ओळखणं कठीण जायचं. मात्र, याच गोष्टीचा त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. “सुमनताई लताबाईंसारखं गायच्या, हेच त्यांचं दुर्भाग्य होतं. सुमनताई लता बाईंसारखं गातात हेच दुर्भाग्य होतं… साक्षात लताबाई असताना… सुमनताईंना कोण बोलवणार? याची सल त्यांना ही असणार, पण ताईंचं मोठे पण असं की, त्यांनी कधी हे कुठेही बोलून नाही दाखवलं… इतका सुज्ञपणा म्हणा किंवा दिलदारपणा म्हणा त्यांच्याजवळ नक्की होता… लताबाईंबरोबर त्याची मैत्री होती… त्यांचा आवाज लता बाईंसारखा जरूर होता… पण स्वर लगाव दोघींचे भिन्न होते… दमसास वेगळा होता… ,” असं त्यांनी नमूद केलं.
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/06/02/deool-band-2-delivers-a-strong-performance-at-the-box-office-earns-this-many-crores-in-12-days/
तसेच, सुमनताईंनी कधीही याबाबत नाराजी व्यक्त केली नाही, उलट त्यांनी मोठेपणा आणि दिलदारपणा जपला, असंही मांगले यांनी सांगितलं. त्यांच्या मते, आवाजात साधर्म्य असलं तरी दोघींची गायनशैली आणि स्वरलगाव वेगळा होता. ८९ वर्षीय ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अजरामर आवाज गमावला आहे.