खासदार नारायण राणे यांचा विश्वास; वर्सोवा प्रवासी जेट्टी आणि ऑनलाइन तिकीट प्रणालीचा शुभारंभ
मुंबई : “मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्याचे काम भाजप आणि महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबईचा प्रत्येक विभाग मी जवळून पाहिला असून येथील झोपडपट्ट्या आणि समस्यांची मला पूर्ण जाणीव आहे. आगामी काही वर्षांत मंत्री नितेश राणे आणि संबंधित खात्यामार्फत नरिमन पॉईंटप्रमाणे वर्सोव्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील,” असा विश्वास माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
https://prahaar.in/2026/06/02/cabinet-decision-criteria-for-farmer-loan-waiver-announced/
वर्सोवा (मांडवी गल्ली) येथे आयोजित ‘वर्सोवा प्रवासी जेट्टी उद्घाटन आणि सुशोभीकरण’ कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पुरन-सिंग, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., संचालक मंडळाचे सदस्य अभिजित ब्रह्मनादकर आणि बाळासाहेब देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सोहळ्यात वर्सोवा ते मढ या जलमार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी ‘व्हॉट्सॲप आधारित डिजिटल तिकीट प्रणाली’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.खा. राणे म्हणाले, “मी ७ वर्षे मुंबईचा नगरसेवक, १२ वर्षे महसूल मंत्री आणि गेली ४० वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात राहून काम केले आहे. आम्ही राजकारण करण्यासाठी येत नाही, तर लोकांचे जीवनमान सुधारावे हाच आमचा धर्म आहे. आमचे कुटुंबीय जात, पात समोर ठेवून काम करत नाही. मुंबईतील नागरिकांना चांगल्या दर्जाचे नागरी वातावरण मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या भागातील अस्वच्छता आणि अवैध बांधकामे हटवून अवघ्या ४५ दिवसांत वर्सोवा जेट्टीचा जो कायापालट झाला, ही तर केवळ सुरुवात आहे; यापुढे हा परिसर आणखी बदलेल,” असे राणे म्हणाले.
खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणेंच्या हस्ते मुंबईतील वर्सोवा जेट्टीचे उद्घाटन@NiteshNRane @MeNarayanRane
.
.
.#prahaarnewsline #marathinews #niteshrane #shiping #port #ianguration #nileshrane pic.twitter.com/QJZinsqa9i— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) June 2, 2026
तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार