Home ताज्या घडामोडी Monsoon Fashion Tips : मान्सूनमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा

Monsoon Fashion Tips : मान्सूनमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा

0
Monsoon Fashion Tips : मान्सूनमध्ये स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा

पावसाळा (Rainy Season) सुरू झाला की ऑफिसला जाणाऱ्या अनेकांसमोर एक सामान्य प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कोणते कपडे घालावेत? पाऊस, ओलावा आणि दमट वातावरणामुळे कपड्यांची योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते. चुकीच्या फॅब्रिकचे कपडे परिधान केल्यास दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे पावसाळ्यात आरामदायी आणि लवकर सुकणाऱ्या कपड्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. (Monsoon Fashion Tips)

शिफॉन फॅब्रिक – पावसाळ्यात शिफॉन फॅब्रिकचे कपडे हा चांगला पर्याय मानला जातो. हे कपडे वजनाने हलके असतात आणि भिजल्यानंतरही लवकर सुकतात. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी शिफॉन ड्रेस किंवा टॉप्स तसेच पॅन्ट उपयुक्त ठरू शकतात. यामुळे दिवसभर फ्रेश वाटण्यास मदत होते.

सुती कपडे – सुती कपडे देखील अनेकांच्या पसंतीचे असतात. कॉटन फॅब्रिक त्वचेला आरामदायी वाटते. मात्र, खूप जाड सुती कपड्यांऐवजी हलक्या प्रकारच्या कॉटन कपड्यांची निवड केल्यास अधिक सोयीचे ठरते.

नायलॉन फॅब्रिक – नायलॉन फॅब्रिकचे कपडेही पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे कपडे पावसाच्या पाण्यामुळे जास्त जड होत नाहीत आणि इतर फॅब्रिकच्या तुलनेत लवकर कोरडे होतात. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्यांसाठी नायलॉनचे कपडे उपयुक्त ठरू शकतात.

याशिवाय पावसाळ्यात अतिशय घट्ट कपडे परिधान करणे टाळावे. कपडे ओले झाल्यानंतर ते शरीराला चिकटतात आणि त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तसेच संपूर्ण लूकवरही त्याचा परिणाम होतो. सैलसर आणि आरामदायी कपडे निवडल्यास तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वावरू शकता.

पावसाळ्यात योग्य फॅब्रिक आणि आरामदायी कपड्यांची निवड केल्यास ऑफिसमधील दिवस अधिक सुखकर आणि ताजेतवाने जाऊ शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here