Crime News: सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वांद्रे प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे आयटीआय विभागात एकच खळबळ उडाली आहे.
दंड कमी करण्यासाठी मागितली लाच
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकीच्या बसवर आरटीओ विभागाने 26 हजार 500 रुपयांचा दंड आकारला होता. हा दंड कमी करून देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. विभागाने जाळ रचत लिपिक मिथुन विलास आडेला पाच हजारांची लाज घेताना रंगेहाथ अटक केली.
https://prahaar.in/2026/06/02/will-matin-patel-get-relief-or-will-his-troubles-increase/
ACB कडे तक्रार, रचला सापळा
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. वरळी येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल होताच अधिकाऱ्यांनी प्राथमिक पडताळणी करून कारवाईची तयारी सुरू केली. एसीबीने आखलेल्या सापळ्यानुसार तक्रारदाराने आरोपी लिपिकाला 4 हजार रुपयांची रक्कम दिली. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मिथुन आडे याला रंगेहाथ ताब्यात घेतले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या व्यवहारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/02/1-7-crore-beloved-sisters-will-receive-regular-money/
सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत
या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एसीबीची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. शासकीय यंत्रणांमध्ये स्वच्छता वाढवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर दरु लागली आहे.