Home क्राईम हॉटेलमध्ये पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं; संतापलेल्या पत्नीने भररस्त्यात केला गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

हॉटेलमध्ये पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं; संतापलेल्या पत्नीने भररस्त्यात केला गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

0
हॉटेलमध्ये पतीला प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं; संतापलेल्या पत्नीने भररस्त्यात केला गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विवाहित तरुण, त्याची पत्नी आणि कथित प्रेयसी यांच्यात झालेल्या वाद दिसत आहे. हॉटेलमध्ये पती कथित प्रेयसीसोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नी तेथे पोहोचली आणि त्यानंतर घडलेल्या प्रकाराने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आग्रा येथील ताजगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये विवाहित तरुण आपल्या कथित प्रेयसीसोबत गेला होता. याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाल्यानंतर ती तातडीने हॉटेलमध्ये दाखल झाली. तेथे पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच पत्नीचा पारा चढला. सुरुवातीला दोन्हींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळातच हा वाद अधिक वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने दोघींना समजवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने कथित प्रेयसीला हॉटेलबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, हॉटेलमधून बाहेर पडताच पत्नी पुन्हा संतापली आणि हा वाद पुन्हा वाढला.

कथित प्रेयसी स्कूटीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पत्नी तिच्या मागे गेली. तिने स्कूटी थांबवत संबंधित महिलेला खाली उतरवले. त्यानंतर दोघींमध्ये रस्त्यावरच झटापट झाली. या घटनेदरम्यान एकमेकींचे केस ओढणे, ढकलाढकली आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

या गोंधळामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत दोघींना वेगळे केले. त्यानंतर संबंधित महिला तेथून निघून गेली. दरम्यान, उपस्थितांपैकी एका व्यक्तीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here