बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली. चित्रपटांचे शो हाऊसफुल्ल होत आहेत.
‘देऊळ बंद २’ चित्रपट २१ मे ला चिटपटगृहात रिलीज झाला होता. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटातून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. तो असा की, आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्याने परिस्थितीत सुधारणा करणे गरजेचे आहे. अपरंपार स्वामी भक्ती येथे चित्रपटात पाहायला मिळत आहे. ११ व्या दिवशी चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.
https://prahaar.in/2026/06/01/jee-advanced-2026-result-air-1/
‘देऊळ बंद २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११ :
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजेच ११ व्या दिवशी वीकेंडला २,०१५ शोजमधून ₹५.७५ कोटींचे नेट कमाई केली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. यामुळे आतापर्यंतची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ₹५१.८३ कोटी आणि एकूण नेट कमाई ₹४४.०५ कोटी रुपये इतकी झाली आहे.’देऊळ बंद २’ च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.
https://prahaar.in/2026/06/01/arun-lakhani-bjp-nominates-arun-lakhani-mp-supriya-sules-husband-for-legislative-council-sparks-debate-in-political-circles/
दिवस १ – ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ – ६. १० कोटी रुपये
दिवस ५ – ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ – ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ – ३.६० कोटी रुपये
दिवस ८ – ४.५५ कोटी रुपये
दिवस ९ – ३.१० कोटी रुपये
दिवस १० – ५ कोटी रुपये
दिवस ११ – ५.७५ कोटी रुपये
एकूण – ४४.०५ कोटी रुपये
https://prahaar.in/2026/06/01/not-angry-with-parth-pawar-sunil-tatkare/
‘देऊळ बंद २’ हा चित्रपट २०१५ साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद’ चा सीक्वल आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत आणि स्नेहल तरडे महिला शेतकरीच्या भूमिकेत झळकली आहे. चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.